LIC Scheme | LIC ही भारतातील सर्वात मोठी विमा कंपनी आहे. एलआयसी त्यांच्या ग्राहकांसाठी अनेक विमा योजना चालवते. ज्यामध्ये लोकांना विम्या सोबत गुंतवणूक करून भरघोस लाभ मिळवण्याचे संधी देखील उपलब्ध आहेत.
एलआयसी त्यांच्या ग्राहकांसाठी नवीन नवीन योजना आखत असते. अशीच एक योजना त्यांच्या ग्राहकांसाठी एलआयसी घेऊन आली आहे. ती म्हणजे एलआयसी जीवन लाभ यामध्ये पॉलिसीधारकांना विम्याचे संरक्षण देखील मिळणार आहे. चला तर जाणून घेऊया ही योजना कशी काम करते.
LIC जीवन लाभ योजना म्हणजे काय? (What is LIC Jeevan Labh Yojana?)
एलआयसी द्वारे त्यांच्या ग्राहकांसाठी अनेक अशी योजना राबवल्या जातात अशी एक योजना म्हणजे एलआयसी जीवन लाभ होय. ही योजना मर्यादित प्रीमियम नॉन लिंक्ड, नफ्यासह एंडोमेंट योजना आहे. योजनेच्या दिलेल्या मुदती दरम्यान पॉलिसी धारकाचा जर अचानक मृत्यू झाल्यास आणि पॉलिसीधारक पॉलिसीच्या मदतीपूर्वी जिवंत राहिल्यास कंपनीकडून कुटुंबाला एक रकमे रक्कम दिली जाते. यासोबत कर्जाची सुविधा देखील दिली जाते.
एलआयसी जीवन लाभ तर सर्वात मोठा फायदा म्हणजे मृत्यूलाभ. एलआयसी धारकाचा जर प्लॅनच्या मुदतीदरम्यान मृत्यू झाल्यास, तर त्याच्या वारसांना वार्षिक प्रीमियमच्या दहापट रक्कम वितरित केली जाते. आणि मृत्यूचा लाभ आत्तापर्यंत भरलेल्या प्रीमियमच्या 105% पेक्षा कमी असू शकत नाही. तथापी यासाठी पॉलिसी प्रीमियम वेळेवर भरणे आवश्यक असणार आहे.
54 लाखांचा फायदा असा मिळवा
समजा 25 वर्षीय व्यक्तीने वीस लाख रुपयांचा विमा रकमेसह पंचवीस वर्षाची मुदतीची योजना निवडल्यास. त्याला सोळा वर्षासाठी वार्षिक 88,910 रुपये किंवा अंदाजे 243 रुपये प्रति दिन प्रीमियम भरावा लागणार आहे. अशा प्रकारे वयाच्या 50 व्या वर्षी त्याला 54.00 लाख रुपये पर्यंत लाभ मिळणार आहे.