LIC Scheme | नमस्कार मित्रांनो एलआयसी त्यांच्या ग्राहकांसाठी नवीन नवीन योजना आखत असते. अशीच एक योजना आता एलआयसी तुमच्यासाठी घेऊन येत आहे. या योजनेमध्ये तुम्ही गुंतवणूक करून आयुष्यभर पेन्शन मिळू शकता. चला तर जाणून घेऊया कसा मिळवायचा या योजनेचा लाभ.
आजकाल वृद्धापकाळात ज्येष्ठ नागरिकांना अनेक अशा समस्यांना तोंड द्यावा लागत असते. ज्यावेळेस आपण कमवत राहतो तोपर्यंत त्याला इतरांची मदत घ्यावी गरज भासत नसते.
परंतु ज्या वेळेस व्यक्तीचे वय वाढत जाते त्यावेळेस काम करणे कठीण जाते व त्यावेळेस मदत करणारा साथ देणारा कोणी नसते.(LIC Scheme)
अशा परिस्थितीमध्ये तुम्ही एलआयसीच्या या योजनेमध्ये गुंतवणूक करून म्हातारपणी या योजनेचा पेन्शन द्वारे लाभ घेऊ शकता. जर तुम्ही भविष्यामध्ये येणाऱ्या संकटासाठी गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर ही माहिती तुमच्यासाठीच असणार आहे.
या लेखामध्ये आज आम्ही तुम्हाला एलआयसीच्या खास योजनेबद्दल माहिती सांगणार आहोत. या योजनेमध्ये तुम्ही गुंतवणूक केल्यास तुम्हाला आयुष्यभर पेन्शनची सुविधा मिळणार आहे.
देशभरामधील प्रत्येक गुंतवणूकदाराला एलआयसी मध्ये गुंतवणूक करणे सुरक्षित व पहिला पर्याय म्हणून याकडे पाहत असतात. याशिवाय तुम्हाला इथून मजबूत परतावा देखील मिळू शकतात.
एलआयसी कडून त्यांच्या ग्राहकांसाठी अनेक योजना सुरू केल्या आहेत. आम्ही ज्या योजनेबद्दल तुम्हाला माहिती आज सांगणार आहोत त्या योजनेची माहिती आश्चर्यकारक असणार.
एलआयसीच्या विशेष योजनेबद्दल सांगायचं झाल्यास या योजनेचे नाव सरल पेन्शन योजना आहे. ही एक नॉन लिंकड सिंगल प्रीमियम योजना आहे.
तुम्ही या योजनेमध्ये एक वेळेस गुंतवणूक केल्यास तुम्हाला या योजनेचा आयुष्यभर पेन्शन लाभ मिळणार आहे.
या योजनेमध्ये कोण गुंतवणूक करू शकतो.
एलआयसी द्वारे चालवल्या जाणाऱ्या सरल पेन्शन योजनेमध्ये पती-पत्नी दोघेही असणे आवश्यक आहेत.
या योजनेंतर्गत गुंतवणूक करण्याची किमान वय तीस वर्षे आणि कमाल 80 वर्षे इतके असावे.
इतकी मिळेल तुम्हाला पेन्शन
या योजनेमध्ये तुम्हाला मासिक, त्रिमासिक सहामाही आणि वार्षिक पेन्शन मिळू शकते.
- मासिक पेन्शन मध्ये 1000 रु
- त्रिमासिक पेन्शन 3000 रू
- सहामासिक पेन्शन 6000 रु
- वार्षिक पेन्शन 12000 रु