Ladki Bahin Yojana Update: महाराष्ट्रात सुप्रसिद्ध ठरलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठे वक्तव्य केले आहे. अजित पवार म्हणाले की, आम्ही महिलांच्या कल्याणासाठी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. महिलांचे प्रश्न सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. लाडकी बहीण योजनेवरून आमच्यावर अनेक वेळा विरोधकांकडून टीका केली जात आहे. ही योजना बंद होणार असे देखील काही जणांकडून म्हटले जात आहे. पण येते आठवड्यात लाडकी बहीण योजनेच्या पुढील हप्त्याचे पैसे महिलांच्या खात्यात जमा करू असे वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्टपणे केले आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे लाडक्या बहिणींना मोठा दिलासा मिळाला आहे.
हे पण वाचा | लाडक्या बहिणींना 2,100 रुपयाचा हप्ता कधी मिळणार? आली मोठी अपडेट समोर..
लाडकी बहीण योजनेबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी मोठे वक्तव्य केले आहे. तेथे आठवड्यात लाडक्या बहिणींना पुढील हप्त्याचे पैसे मिळणार असल्याचे अजित पवार यांनी सांगितले आहे. आमच्या सरकारने एक रुपयांमध्ये पिक विमा दिला मात्र याचा देखील गैरप्रकार किती केला गेला. गायरान जमिनीवर शासकीय जमिनीवर पिक विमा काढण्यात आले आहेत. शेतकऱ्यांना दिलेल्या योजनेचे पैसे खाल्ले, कुठे फेडाल हे पाप? योजनेचा योग्य फायदा घेतला पाहिजे असेही अजित पवार यांनी म्हटले आहे. Ladki Bahin Yojana Update
हे पण वाचा | लाडक्या बहिणींना कधी मिळणार 2,100 रुपये? जाणून घ्या सविस्तर माहिती…
जालना जिल्ह्यातील परतुरधील माजी आमदार सुरेश जेथलिया यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार यांच्या पक्षांमध्ये प्रवेश झाला. त्यानंतर अजित पवार यांनी हे वक्तव्य केले आहे. अजित पवार म्हणाले, आम्ही बेरजेचे राजकारण करतो. हा शिव शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे तीच परंपरा आपल्याला टिकवायचे आहे. जातीय सलोखा टिकला पाहिजे यासाठी आपण काम केले पाहिजे असेही अजित पवार यांनी म्हटले आहे. आम्ही यापुढे स्थानिक पदाधिकाऱ्यांना अधिकार देणार आहोत जो सामाजिक बांधिलकी जपून काम करतोय अशा होतकरू तरुणांना जिल्हा परिषद नगर परिषद मध्ये संधी देणार आहोत असेही अजित पवार यांनी म्हटले आहे. महायुतीमध्ये सन्मान वय नेमले आहेत. आम्ही सर्वांना सांगितले आहे महामंडळ कोणाला कोणते हवे ते घ्या सर्वांना संधी द्या. आपला महाराष्ट्र साधू संतांची भूमी असलेला आहे असेही पवारांनी म्हटले आहे.
हे पण वाचा | लाडक्या बहिणींना फेब्रुवारीचा हप्ता उशिरा मिळणार, पडताळणी पूर्ण झाल्यावरच खात्यात पैसे जमा होणार?
आज आपण बघतोय टीव्ही लावला की हा आमका असा म्हणाला तो असा म्हणाला. आरोप प्रति आरोप करून सर्वसामान्याचे प्रश्न सुटणार नाहीत असेही अजित पवार यांनी म्हटले आहे. ब्रेकिंग न्यूज दाखवली जाते सूत्र सूत्र अरे कुठे आहेत हे सूत्र. सर्वसामान्य जनतेला सांगतो अशा खोट्या बातम्या वर विश्वास ठेवू नका असेही अजित पवार यांनी यावेळी सांगितले आहे. माझा राजकारणात 1991 सालीपासून च प्रवास आहे. मराठवाडा विदर्भ खानदेश राज्यातील प्रत्येक जिल्ह्याचा अभ्यास आम्हाला करायला भेटल्याचे अजित पवार यांनी म्हटले आहे. सर्वसामान्य नागरिकांचे आणि शेतकऱ्यांचे प्रश्न आम्ही जाणतो आणि ते सोडवण्याचे प्रयत्न देखील करतो असे पवार यांनी सांगितले आहेत.
अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा