Ladki Bahin Yojana Scheme: महाराष्ट्र सरकारने खास महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत सध्या 1500 रुपये दरमहा महिलांना दिले जातात. मात्र विधानसभा निवडणुकीदरम्यान लाडक्या बहिणींना 2100 रुपये देऊ असे आश्वासन महायुती सरकारने दिले होते. दरम्यान विधानसभा निवडणुका होऊन दोन महिने झाले आहेत. मात्र अजून लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांना 2100 रुपये कधी मिळणार याबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आली नाही.
महायुती सरकारच्या अनेक बड्या नेत्यांनी अर्थसंकल्पानंतर महिलांना 2100 रुपये मिळणार असल्याचे सांगितले आहे. मात्र अजून याबाबत कोणतीही माहिती अधिकृतपणे समोर आली नाही. राज्याचा अर्थसंकल्प कधी सादर होणार महिलांना वाढीव रक्कम कधी मिळणार असे अनेक प्रश्न महिलांना पडत आहेत. या सर्व प्रश्नाचे उत्तर आपण जाणून घेण्याचा प्रयत्न या लेखांमधून करणार आहोत. Ladki Bahin Yojana Scheme
हे पण वाचा | अर्थसंकल्पानंतर लाडकी बहीण योजना होणार बंद? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं स्पष्ट..
राज्याचा अर्थसंकल्प कधी सादर होणार?
लाडकी बहीण योजनेतील वाढीव हप्त्याची वाट पाहत असलेल्या महिलांना असा प्रश्न पडला आहे की राज्याचा अर्थसंकल्प कधी सादर होणार? कारण राज्याच्या अर्थसंकल्पानंतर हे पैसे मिळणार असल्याचे महायुतीच्या नेत्यांनी सांगितले आहे. राज्याचा अर्थसंकल्प 3 मार्च रोजी सादर होणार आहे. याबाबत अर्थमंत्री अजित पवार यांनी माहिती देखील दिली आहे. दरवर्षी एक मार्च रोजी राज्याचा अर्थसंकल्प सादर केला जातो. यावर्षी अर्थमंत्री अजित पवार राज्याचा अर्थसंकल्प सादर करणार आहे.
हे पण वाचा | अंगणवाडी सेविकांची 18882 पदाची मेगा भरती; आवश्यक कागदपत्रे आणि अर्ज कसा करावा? जाणून घ्या..
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार?
या अर्थसंकल्पात सर्वसामान्य नागरिकांसाठी अनेक मोठ्या घोषणा होऊ शकतात. यामध्ये लाडकी बहीण योजनेबाबत देखील मोठी घोषणा केली जाऊ शकते. लाडकी बहीण योजनेत महिलांना 2100 रुपये देण्याचा निर्णय देखील होऊ शकतो. महिला व बाल विकास विभागाने अर्थ मंत्रालयाकडे प्रस्ताव पाठवल्यानंतर यावर निर्णय घेतला जाऊ शकतो असे सांगण्यात येत आहे. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार मार्च महिन्यातील अर्थसंकल्पानंतर लाडक्या बहिणींना 2100 रुपये मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
हे पण वाचा | शेवटची संधी! रेशन कार्डची KYC करा नाहीतर रेशन होणार कायमचे बंद..
लाडकी बहीण योजना बंद होणार का?
दरम्यान मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत सर्वत्र मोठ्या चर्चा होत आहेत. विरोधक ही योजना बंद होणार असल्याची टीका देखील मोठ्या प्रमाणात करत आहेत. या योजनेमुळे इतर योजनेवर प्रभाव पडत आहे असे देखील म्हटले जात आहे. या सर्व चर्चांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पूर्णविराम दिला आहे. लाडकी बहीण योजना कधीच बंद होणार नाही उलट आम्ही या योजनेत अधिक वाढ कशी करता येईल याचा प्रयत्न करू असे त्यांनी यावेळी सांगितले आहे.
अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन करा