Monsoon Update 2025 News : राज्यात उकाड्यानं नाकात दम आणला असतानाच आता वरुणराजा थेट दारात उभा राहिल्यासारखा आहे. आकाशात दुपारी डोक्यावर तापणारं ऊन आणि संध्याकाळी अंगावर घाम काढणारी आर्द्रता या हवामानाच्या खेळामुळे राज्यात वीजांचा कडकडाट आणि मुसळधार पावसाने हजेरी लावायला सुरुवात केली आहे. याचं मुख्य कारण म्हणजे देशभर पसरलेली द्रोणीय स्थिती आणि समुद्रातून येणारे दमदार वारे!
हवामान खात्यानं पुढचे ५-६ दिवस राज्यात जोरदार पावसाचा अलर्ट दिला आहे. विशेष म्हणजे, २०, २१ आणि २२ मे रोजी कोकण-गोवा, दक्षिण मध्य महाराष्ट्रात सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय. म्हणजेच छत्र्या, रेनकोट तयार ठेवा आणि बिनकामाचे बाहेर पडू नका!
कोणते जिल्हे टार्गेटवर आहेत? रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, धाराशिव, लातूर, बीड, परभणी, नांदेड, चंद्रपूर, यवतमाळ आणि गडचिरोली – या चौदा जिल्ह्यांमध्ये मान्सूनपूर्व वळवाचा जबरदस्त पाऊस अपेक्षित आहे. काही ठिकाणी तर विजा कोसळणार, वाऱ्याचा जोर ५० ते ६० किमी प्रतितासपर्यंत जाईल असा अंदाज आहे. कोणीही हलगर्जीपणा करू नका!Monsoon Update 2025 News
दरम्यान, केरळमध्ये ३१ मे रोजी मान्सून दाखल होण्याची शक्यता असल्यामुळे महाराष्ट्रातही यंदा मान्सून लवकर पोहोचेल अशी चिन्हं दिसतायत. विशेषतः मुंबई, रायगड, ठाणे परिसरात मे अखेरीस पावसाचे मुसळधार स्वरूप जाणवायला लागेल.
यंदाच्या उन्हाळ्याचा शेवट जरा वेगळाच होतोय. तापमान उकडतंय, पण त्याचवेळी ढगांच्या लाटा वरून धडकतायत. अमरावती विभागात तर दोन दिवसांपासून चांगलाच पाऊस पडतोय. बीड, परभणी, नांदेड इथंही ढगफुटीच्या शक्यता हवामान खात्यानं सूचित केल्या आहेत.
देशभरातही पावसाची थैमान सुरुच आहे आसाम, ओरिसा, सिक्किम, तेलंगणा, कर्नाटक, आंध्रप्रदेश या राज्यांमध्ये आधीच वरुणराजा धुमाकूळ घालतोय. बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रातील स्थिती पाहता महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी, आणि शहरात राहणाऱ्यांनी देखील पावसाच्या जोराची तयारी सुरू ठेवावी लागणार आहे.
आता हा पाऊस केवळ थोडा वेळ पडून थांबणार नाही. पुढच्या आठवड्यात दररोज एखादा जिल्हा नक्कीच भिजणार काही ठिकाणी तर पूर्ण दिवस अंधार आणि विजांच्या आवाजात जाईल.
एक गोष्ट स्पष्ट, यंदा मान्सूनचं आगमन वेळेआधी होणार! आणि हा पाऊस म्हणजे नुसतं थेंब नव्हे – ढगफुटीचं नाट्य सुरू होणार आहे.
Disclaimer : वर दिलेली माहिती ही प्रसार माध्यमांच्या आधारे व हवामान खात्याच्या अंदाजानुसार आहे. तुमच्या भागातील हवामानाचा अंदाज वेगळा असू शकतो त्यामुळे हवामान खात्याच्या अंदाजाकडे लक्ष द्या.
हे पण वाचा | मुंबईसह राज्यात मोठे चक्रीवादळ धडकणार; हवामान खात्याचा मोठा इशारा; वाचा सविस्तर माहिती