Ladki Bahin Yojana: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने संदर्भात सध्या वेगवेगळ्या बातम्या समोर येत आहेत. ज्या महिला लाभ घेण्यासाठी पात्र नाही त्यांना योजनेतून वगळण्यात येणार असल्याच्या चर्चा प्रसारमाध्यमांमध्ये मोठ्या प्रमाणात होत आहेत. अशातच आता एक मोठी अपडेट समोर आली आहे. ज्या कुटुंबाचे आर्थिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी आहे. अशा कुटुंबातील महिलांना आर्थिक मदत मिळावी या उद्देशाने गेल्या वर्षी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांना दर महिन्याला 1500 रुपये दिले जातात.
जुलै महिन्यापासून ते जानेवारी महिन्यापर्यंत लाडक्या बहिणींना एकूण सात हप्त्याचे दहा हजार पाचशे रुपये मिळाले आहेत. या योजनेला महिलांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. राज्यात पुन्हा एकदा महायतीचे सरकार स्थापन करण्यात या योजनेचा मोठा वाटा आहे. विधानसभा निवडणुकीदरम्यान आमचे सरकार पुन्हा एकदा आले तर महिलांना दरमहा 2100 रुपये देऊ असे आश्वासन महायुतीच्या सरकारने केले होते. लाडक्या बहिणींच्या आशीर्वादाने राज्यात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार आले आहे. त्यामुळे लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये 2100 रुपये कधीपासून जमा होणार? याच प्रश्नाकडे सर्व राज्यातील महिलांचे लक्ष लागले आहे. मार्च महिन्यातील अर्थसंकल्पात याबाबत निर्णय घेऊन महिलांच्या बँक खात्यामध्ये दरमहा 2100 रुपये जमा करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मात्र दुसरीकडे जर महिलांच्या खात्यात दरमहा एक वीस रुपये जमा केल्यास सरकारवर मोठा आर्थिक ताण येऊ शकतो. इतर योजनेचा पैसा लाडके बहिण योजनेकडे वळवण्यात आल्यामुळे इतर योजना ठप्प झाले असल्याच्या चर्चा प्रसार माध्यमांमध्ये मोठ्या प्रमाणात होत आहेत. त्यामुळे ही योजना बंद होणार का अशी चर्चा देखील होत आहे. मात्र याबाबत आता मोठी अपडेट समोर आली आहे. मंत्री शंभूराजे देसाई यांनी योजनेबाबत बोलताना मोठा खुलासा केला आहे. काय म्हणाले शंभूराजे देसाई याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया. Ladki Bahin Yojana
मंत्री शंभूराजे देसाई म्हणाले की, लाडकी बहीण योजनेमुळे काहीही थकीत नाही, लाडकी बहीण योजना ही गोरगरीब कुटुंबातील महिलांसाठी आहे त्यामुळे ही योजना कायमस्वरूपी सुरू राहणार असल्याचा खुलासा त्यांनी यावेळी केला आहे. तसेच सरकार मागील वर्षाचा स्लीप ओव्हर या व वर्षाच्या आर्थिक वर्षात भरून काढणार आहे. असे देखील त्यांनी यावेळी म्हटले आहे. फेब्रुवारी चा आता देखील फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या एक किंवा दोन आठवड्यात महिलांच्या खात्यात जमा होईल असे त्यांनी यावेळी सांगितले आहे.