Kapus Bajar Bhav | राज्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची व आनंदाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे कापूस बाजारभावात झालेली वाढ. काही बाजार समितीमध्ये कापसाच्या दरात वाढ झाल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे.
यवतमाळ जिल्ह्यातील नेर परसोपत बाजार समिती वगळता सर्वच बाजार समितीमध्ये दर चांगले पाहायला मिळाले आहे. मिळाले विशेष म्हणजे आज बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा बाजार समितीमध्ये कापसाला (Kapus Bajar Bhav) उंचांकी कमाल 8 हजार 100 रुपये प्रति क्विंटल एवढा दर मिळाला आहे. त्यामुळे राज्यातील आता कापूस जर 8000 टप्पा पार केला आहे कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची व दिलासादायक बातमी मानली जात आहे.
राज्यातील कापूस बाजार भाव Cotton market price in Maharashtra
कापसे दरात वाढ झाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले आहे. परंतु कोणत्या बाजार समितीमध्ये कापसाला सर्वाधिक घर मिळाला आहे, ते जाणून घेणे महत्त्वाचे आहे. बुलढाणा जिल्ह्यामधील देऊळगाव राजा बाजार समितीमध्ये आज 100 क्विंटल कापसाचे आवक झाले असून येथे सर्वाधिक आठ हजार 100 इतका दर मिळाला आहे. तसेच सर्व कमीत कमी सात हजार रुपये तर सर्वसाधारण 7575 रुपये प्रति क्विंटल इतक दर मिळाला आहे.
तसेच राज्यातील वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट बाजार समितीमध्ये आज 10000 क्विंटल कापसाची आवक झालेली आहे. तसेच इथे जास्तीत जास्त 7785 ते कमीत कमी सहा हजार रुपये तर सरासरी 6500 रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळाला आहे.
चंद्रपूर जिल्ह्यामधील वरोरा- माढेली बाजार समितीमध्ये आज बाराशे क्विंटल कापसाचे जावक झालेली आहे. तसेच इतर जास्तीत जास्त 7500 ते कमीत कमी सहा हजार तीनशे पन्नास रुपये तर सर्वसाधारण 7000 रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळाला आहे.
तसेच नागपूर जिल्ह्यातील पारशिवनी बाजार समितीमध्ये आज 1496 कुंटल कापसाचे आवक झालेली आहे. तसेच जास्तीत जास्त सात हजार एकशे पन्नास रुपये ते कमीत कमी सहा हजार आठशे रुपये तर सर्वसाधारण 7000 रुपये प्रति क्विंटन इतका दर मिळाला आहे. यवतमाळ जिल्ह्यातील नेर परसोपंत बाजार समितीमध्ये आज चार क्विंटल कापसाचे आवाहन झाले असून, येथे जास्तीत जास्त 6500 ते कमीत कमी 6500 तर सरासरी 6500 रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळाला आहे.
हळूहळू कापसाचे बाजारभाव वाढत असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. परंतु तज्ञांच्या मते येत्या काळात कापसाचे भाव आणखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी कापूस हा टप्प्याटप्प्यात विकावा असे देखील मत तज्ञांनी व्यक्त केले आहे.