Punjab Duck Weather ForecastPunjab Duck Weather Forecast
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Punjab Duck Weather Forecast : महाराष्ट्र मध्ये या दोन-चार दिवसापासून विविध भागांमध्ये ढगाळ वातावरण तयार झालेले आहे. तरी काही ठिकाणी मध्यम पाऊस झाला आहे. अजून काही जिल्ह्यामध्ये अवकाळी पाऊस सुरूच आहे.

24 तासांचा विचार केला तर 24 तासांमध्ये राजे तर उत्तर महाराष्ट्रातील धुळे नंदुरबार जळगाव नाशिक छत्रपती संभाजी नगर तसेच अहमदनगर मधील काही भागांमध्ये मुसळधार पावसाची नोंद करण्यात आलेली आहे.

तर संबंधित जिल्ह्यामध्ये काही भागांमध्ये गारपीट देखील झालेली आहे. तसेच पुणे मुंबई शहरांमध्ये विविध भागांमध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावलेली आहे. त्यामुळे मात्र शेतकऱ्यांची पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे.

काही भागात गारपीट झाले असल्याने शेतकऱ्यांचे पिकांचे अतोनात नुकसान झालेले आहे. भारतीय हवामान विभागाणे नुकत्याच काही दिवसांपूर्वी राज्यात अवकाळी पाऊसचा अंदाज वर्तवलेला होता.

त्यासोबत ज्येष्ठ हवामान तज्ञ पंजाबराव डक त्यांनी देखील एकच नंबरला आपल्या सुधारित हवामान अंदाज राज्यातील काही भागांमध्ये 25 नोव्हेंबर पासून नाव काय पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली होती.

त्यानुसार गेल्या दोन-तीन दिवसापासून राज्यातील विविध भागांमध्ये अवकाळी पाऊस मोठ्या प्रमाणात झालेला आहे. म्हणजेच हवामान खात्याचा अंदाज आणि पंजाबराव यांचा अंदाज खरा ठरलेला आहे.

अशा परिस्थितीमध्ये आता पुढील काही दिवस महाराष्ट्रातील हवामान कसे राहणार याबाबत पंजाबराव यांनी काय हवामान अंदाज दिला आहे. याबाबत जाणून घेण्याची शेतकऱ्यांमध्ये उत्सुकता पाहायला मिळत आहे. त्यामुळे आता आपण पंजाबराव आणि महाराष्ट्रात किती तारखेपर्यंत अवकाळी पावसाचा अंदाज दिला याविषयी थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत.

पंजाबराव यांनी सांगितल्याप्रमाणे महाराष्ट्रामध्ये 27 नोव्हेंबर पासून ते 28 नोव्हेंबर पर्यंत अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता आहे. राज्यातील विदर्भ विभागातील काही भाग मराठवाडा विभागातील काही भागात तसेच पश्चिम महाराष्ट्र दक्षिण महाराष्ट्र आणि कोकण विभागामध्ये पावसाची शक्यता वर्तनात आलेली आहे.

म्हणजे राज्यात आज पावसाची शक्यता आहे राज्यात विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस होणार असा अंदाज त्यांनी दिलेला आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनाही सर्व सामान्यांना विशेष काळजी घेणे आवाहन करण्यात आलेले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *