Saturday

15-03-2025 Vol 19

Drip irrigation : तुषार संचधारक शेतकऱ्यांना तीन वर्षानंतर ठिबकचा लाभ ; केंद्राकडून अनुदान धोरणात बदल

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Drip irrigation : शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. तुषार सिंचन लाभ घेतलेल्या त्याच शेतकऱ्यांना तीन वर्षानंतर ठिबकचा लाभ मिळणार आहे.

केंद्र शासनाने सूक्ष्म सिंचनाच्या अनुदानाच्या वाटप धोरणांमध्ये मोठे बदल केलेले आहेत. तुषार संताचा लाभ घेतला शेतकऱ्याला आता पुन्हा सूक्ष्म सिंचना लाभ देण्यास मान्यता मिळाली आहे. तसेच ऑटोमेशनला देखील अनुदानाच्या कक्षेत आणले गेलेले आहे.

केंद्राच्या राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत पंतप्रधान सूक्ष्म सिंचनासाठी प्रती थेंब अधिक पीक या उपक्रमासाठी अनुदान मिळते. या योजनेतील किचकट बाब हटवून काही बदल करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारकडून केंद्र सरकारला पाठवला गेला होता. त्यानुसार केंद्राने 2023 मधील नव्या मार्गदर्शक सूचनांमध्ये बदल केलेले आहेत. सध्याच्या नियमानुसार सूक्ष्म सिंचनासाठी सात वर्षात पुन्हा अनुदान घेता येत नाही. आता हा कालावधी तीन वर्षापर्यंत कमी करण्यात आलेला आहे.

एखाद्या शेतामध्ये तुषार संस्थांसाठी अनुदान घेतलेल्या शेतकऱ्याला आता तीन वर्षानंतर ठिबक संच घेण्याकरिता अनुदान देता येणार आहे. परंतु ठिबक अनुदानाची परिघना करता सिंचनासाठी दिलेला कम ठिबकच्या अनुदानात वजा करून वृक्ष रक्कम शेतकऱ्याला मिळणार आहे.

या बदल्यामुळे शेतकऱ्याला एकाच क्षेत्रावर पीक पद्धतीला बदल करण्यासाठी संधी मिळाली आहे. यामुळे ठिबक खालील क्षेत्र वाढवण्यात येणार असून खते व पाण्याची बचत होण्यास मदत मिळेल असे फलोत्पादन विभागाचे म्हणणे आहे.

फलोत्पादन संचालक डॉ. कैलास मोते यांनी सांगितलेली सूक्ष्म सिंचन कार्यक्रमा राबवण्यात राज्य आघाडीवर आहे. मात्र या योजनेत बदल करण्यासाठी 2022 मध्ये केंद्र ला प्रस्ताव देण्यात आलेला होता. त्यातील बदल स्वीकारण्यात आलेले आहेत.

ठिबक आधारित संचलित प्रणालीसाठी ऑटोमेशन आता प्रती हेक्टरी 40 हजार रुपये अनुदान देण्यास केंद्र सरकारने मान्यता दिली आहे. त्यामुळे राज्यातील ऑटोमेशन आधारित उच्च तंत्रज्ञान कृषी व्यवस्थेला बळकटी मिळणारi आहे.

Rushikesh

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *