Havaman Andaj : राज्याचे हवामानामध्ये सातत्याने बदल होत असल्याने राज्यातील शेतकऱ्यांसाठी चिंताजनक ठरत आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात संपूर्ण देशामध्ये हवामानामध्ये मोठा बदल पाहायला मिळत आहे. याच बदलामुळे शेतकऱ्यांच्या चिंता वाढवताना दिसत आहे. दरवर्षीप्रमाणे नोव्हेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये राज्यात कडाक्याची थंडी पाहायला मिळते.
मात्र, यंदा या महिन्यात अपेक्षित अशी थंडी पाहायला मिळाली नाही. तर नोव्हेंबर महिन्यामध्ये राज्यामध्ये अवकाळी पावसाने धुमाकूळ घातलेले पाहायला मिळाले होते. राज्यात काही भागांमध्ये गुलाबी थंडीला सुरुवात झालेली आहे.
राज्यामध्ये थंडी उशिरा जरी सुरू झाली असली तरी राज्यात काही ठिकाणी दोन दिवसापासून थंडीची चाहूल लागलेली आहे. राज्याच्या हवामानामध्ये सकाळी हुडहुड भरणारी थंडी आणि दुपारी कडक ऊन असा हवामान राज्यामध्ये पहिला मिळत आहे. राज्यामध्ये काही दिवसांपासून नाव काय पावसाने जरी विश्रांती घेतलेली आहे.
तरी काही भागांमध्ये ढगाळ हवामान कायम आहे. सध्याच्या घडीला अवकाळी पाऊस कुठेच पडत नाही परंतु भारतीय हवामान विभागाने नवीन दिलेला हवामान अंदाज मध्ये पुढील 48 घंटे मध्ये देशातील काही भागात पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे.
या दिलेल्या हवामान अंदाज मध्ये राज्यातही पाऊस होणार असा अंदाज देण्यात आलेला आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, उत्तर भागात थंडीचा कडाका वाढत असल्याचा पहिला मिळत आहे. तर दक्षिण भारतात काही भागांमध्ये आगामी 24 तासात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणारा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे.
तर देशाच्या पूर्वेकडील भागामध्ये धोक्याची दाट चादर पसरलेली पाहायला मिळत आहे. आता देशातील बहुतांश भागांमध्ये राज्यात कमाल तापमानात मोठी घट पाहायला मिळत आहे. याचाच परिणाम म्हणून राज्यसह देशांमध्ये मोठा गारवा पाहायला मिळत आहे.
इथे पडणार पाऊस
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार येत्या 48 घंट्यात सिक्कीम राज्यातील काही भागात पाऊस पडणारा अंदाज व्यक्त केलेला आहे. यासोबतच नागालँड आणि अरुणाचल प्रदेश मध्ये देखील पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. देशाच्या दक्षिणेकडील भागामध्ये तमिळनाडू केरळ आणि लक्षद्वीप पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे.
राज्यातील कोकण आणि विदर्भ विभागांमध्ये आज पावसाचा अंदाज देण्यात आलेला आहे. यामुळे विदर्भाने कोकणातील शेतकऱ्यांनी आपल्या शेतकऱ्यांची विशेष काळजी घ्यावी.
अशाच हवामान अंदाज विषय व ताज्या घडामोडी विषयी माहिती जाणून घेण्यासाठी आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा