Havaman Andaj | राज्याच्या हवामानाबाबत एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. बरेच दिवसापासून सतत त्याला राज्याचा हा मनामध्ये बदल होत आहे. महाराष्ट्र मध्ये एकीकडे तापमान वाढ होत आहे. तर दुसरीकडे ढगाळ हवामान आणि अवकाळी पावसासाठी पोषक वातावरण तयार होत आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची डोकेदुखी वाढू लागली आहे.
मागच्या काही दिवसांपूर्वी राज्यामध्ये अचानक झालेल्या अवकाळी पावसाने आणि गारपिटीने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान केले होते.
असच पुन्हा एकदा हवामान खात्याने महाराष्ट्र मध्ये अवकाळी पावसासाठी पोषक वातावरण तयार होत असल्याचा दावा केला आहे.
भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार मराठवाडा विभागातील नांदेड, जालना, हिंगोली आणि परभणी या चार जिल्ह्यात विदर्भातील सर्वच 11 जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
हे पण वाचा | पी एम किसान योजनेचा हप्ता या तारखेला होणार जमा, यादीमध्ये तुमचे नाव पहा
आयएमडीने दिलेल्या अंदाजानुसार या जिल्ह्यामध्ये 29 फेब्रुवारी पर्यंत ढगाळ हवामान आणि तुरळ ठिकाणी किरकोळ स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.
एवढेच नाही तर खानदेश मध्ये देखील मध्य महाराष्ट्र काही जिल्ह्यांमध्ये सुद्धा आगामी दोन दिवस ढगाळ हवामान आणि किरकोळ स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार मध्य महाराष्ट्रातील खानदेश विभागातील जळगाव, धुळे, नंदुरबार या तीन जिल्ह्यांमध्ये तसेच उत्तर महाराष्ट्रातील अहमदनगर आणि नाशिक या दोन जिल्ह्यांमध्ये तसेच मध्य महाराष्ट्रातील सांगली, सातारा, पुणे, कोल्हापूर, सोलापूर या पाच जिल्ह्यामध्ये फक्त दोन दिवस ढगाळ हवामान आणि तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
त्याच कारणामुळे शेतकरी आपल्या शेती पिकांची विशेष काळजी घ्यावी. या ठिकाणी सध्याच्या स्थितीला संक्रमणाचा काळ असूनही परिस्थिती पूर्व मोसंमी हंगामातील पावसासाठी अनुकूल राहते.
हेच कारण आहे की सध्या राज्यातील अवकाळी पावसाचे पर्व सुरू झाली आहे. एकंदरीत सध्या पूर्व मोसमी पाऊस पडण्यासाठी अनुकूल परिस्थिती तयार झाली आहे. याचा फटका शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात सहन करावा लागणार आहे.