Government News | राज्य सरकारने आता महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या पाच हजार डिझेल बसेस बाबत मोठा निर्णय घेतला आहे. आज झालेल्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री यांच्या उपस्थिती बाबत महत्त्वाचा करार करण्यात आला आहे.
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या पाच हजार डिझेल बसेस द्रव्य रूप नैसर्गिक वायू या पर्यायी इंधनावर चालणाऱ्या वाहनांमध्ये रूपांतर करण्यासाठी सरकारने किंग गॅस कंपनी सोबत सामंजस्य करार केला आहे.
एलजी इंधन वापरामुळे डिझेल इंधनाच्या वाहनामुळे होणारा प्रदूषणामध्ये सुमारे दहा टक्के घट होण्यास मदत होणार आहे. त्यामुळे नागरिकांना प्रदूषणापासून मोठा दिलासा मिळणार आहे. त्याचबरोबर महामंडळाची दरवर्षी 234 कोटी रुपयांची बचत होण्यास मदत होणार आहे. या निर्णयामुळे ग्राहकांना देखील मोठा फायदेशीर होणार आहे पर्यावरण पूरक सेवा देखील मिळणार असल्याचे मुख्यमंत्री यांनी यावेळी सांगितले.
माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी झालेल्या बैठकीमध्ये विभागाचे प्रधान सचिव पराग जैन, तसेच किंग गॅस कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक श्री. कुरेशी यांनी सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केलेले आहेत. यावेळी उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर माधव कुसेकर, माहाव्यवस्थापक (भंडार व खरेदी) वैभव वाकोडे उपस्थित होते.
राज्यातील एकूण पाचशे डिझेल वाहन आता LNG वाराण मध्ये रूपांतर हे तीन वर्षांमध्ये एकूण सहा टप्प्यात करण्यात येणार आहे. संपूर्ण पाच हजार बसेस चे रूपांतर झाल्यानंतर दरवर्षी महामंडळाचे सुमारे 234 कोटी रुपयांची बचत होणार आहे. असे श्री जैन यांनी सांगितले आहे. राज्यातील 90 आगारामध्ये एलएनजी इंधन भरण्याची सोय करण्यात येणार आहे.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडील डिझेल इंधनावर चालणारी सुमारे सोळा हजार प्रवासी वाहने आहेत. मामा मंडळाचे एकूण खर्चापैकी सुमारे 34 टक्के खर्च डिझेलवरच केला जातो. हरित परिवाराची संकल्पना राबवण्यासाठी डिझेल ऐवजी पर्याय इंधन वापरण्यासाठी उद्योग विभागाने महाराष्ट्रासाठी एलएनजी हा पर्याय इंधनाचा पुरवठा करण्यासाठी यांच्यासोबत सामंजस्य करार केलेला आहे.
यामुळे नागरिकांना देखील मोठ्या प्रमाणामध्ये फायदा होणार आहे. आणि यामुळे प्रदूषण कमी होणार आहे. रूपांतरित करण्यात आलेल्या वाहनांची देखभाल ही रूपांतर केलेली कंपनीमार्फत करण्यात येणार आहे. त्याचा देखील खर्च महामंडळातर्फे करण्यात येणार आहे.