Gold Price Today : दिवाळीच्या सण संपलेला आहे आजपासून देशांमध्ये लग्नसरा सुरू होणार आहे लग्न सरा सुरू होत असताना चांदीची आणि सोन्याची मागणी अचानक वाढली आहे. दरम्यान तुम्ही जर सोने-चांदी खरेदी करून विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही एक महत्त्वाची बातमी आहे. सोन्या-चांदीच्या दारात किरकोळ वाढ झालेली आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंज वर सोने 61 हजाराच्या व्यवहार करत आहे. तर चांदी 73 हजार रुपयांच्या खाली पोहोचली आहे. सध्या फ्युचर्स मार्केटमधील नवीन दर काय आहे ते जाणून घेऊया.
सोन्या-चांदीच्या दारात किंचित वाढ
आठवड्याच्या शेवटचे व्यवहाराच्या दिवशी वायदे बाजारात सोने कालच्या तुलनेत त 78 रुपयांच्या वाढीसह सध्या 61 हजार 150 रुपये प्रति दहा ग्रॅम पातळीवर आहे. तर काल सोन्याचा दर 61 हजार 70 रुपये इतका होता. आज चांदीच्या दरात देखील किंचित वाढ झाली आहे. चांदीच्या किमतीत अठरा रुपयांनी वाढ झालेली आहे. सध्या ती 72,916 रुपये प्रति किलोवर पोहोचलेली आहे. तर 23 नोव्हेंबर रोजी चांदीचा भाव 72 हजार 901 रुपये होता.
जाणून घ्या प्रमुख शहरांमध्ये सोन्या-चांदीचे दर
दिल्लीमध्ये 24 कॅरेट सोने 62 हजार एकशे वीस रुपये प्रति दहा ग्रॅम वर आहे तर चांदी 76 हजार दोनशे रुपये प्रति किलोग्राम आहे.
मुंबईमध्ये 24 कॅरेट सोने 61 हजार 970 रुपये प्रति दहा ग्रॅम आहे तर चांदी 76 हजार दोनशे रुपये प्रति किलोग्रॅम आहे.
कोलकत्ता मध्ये 24 कॅरेट सोनी 61 हजार 970 रुपये प्रति दहा ग्रॅम वर आहे तर चांदी 76 हजार 200 रुपये प्रति किलोग्राम वर आहे.
चेन्नईमध्ये 24 कॅरेट सोने ६२५०० रुपये प्रति दहा ग्रॅम वर आहे तर चांदी 79 हजार दोनशे रुपये प्रति किलोग्राम आहे.
पुण्यामध्ये 24 कॅरेट सोने 61 हजार 970 रुपये प्रति दहा ग्रॅम आहे तर चांदी 76 हजार दोनशे रुपये प्रति किलो आहे.