Drought concessions : राज्यामध्ये सरासरी पेक्षा कमी पाऊस झाल्यामुळे दुष्काळग्रस्त तालुक्यामध्ये शासन निकषानुसार नंदुरबार तालुक्याचा दुष्काळग्रस्त भागात समावेश केला आहे.
या संबंधित राज्य शासनाने आदेश काढले असून नंदुरबार तालुका साठी दुष्काळाच्या सवलती लागू केली असल्याची माहिती जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी दिली आहे. ( District Collector Manisha Khatri has informed that the concerned state government has issued orders and implemented drought concessions for Nandurbar taluka.)
जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी दिलेल्या प्रसिद्धीस दिलेल्या पत्रात म्हटले आहे की जून ते सप्टेंबर 10 ते 20 या कालावधीत पर्जन्याची तूट उपलब्ध असलेल्या भूजलाची कमतरता, दूर संवेदन विषयक निकष वनस्पती निर्देशांक मुद्रा आर्द्रता पेरणीखालील क्षेत्र व पिकांचे स्थिती या सर्व घटकांचा एकत्रित विचार करून या घटकांना प्रभावित झालेल्या जिल्ह्यातील नंदुरबार तालुक्यामध्ये गंभीर स्वरूपाचा दुष्काळ जाहीर करून सवलती लागू केलेले आहेत.
नंदुरबार तालुका साठी लागू केलेल्या सवलती
- जमीन महसूलात सूट
- पीक कर्जाचे पुनर्गठन
- शेतीच्या निगडित कर्जाच्या वसुली स्थगिती
- कृषी पंपाच्या चालू विज बीलात 33.5% सूट
- शालेय महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात माफी
- रोहयोअंतर्गत कामाच्या निकषात काही अंश शिथिलता
- आवश्यक तिथे पिण्याचे पाणी पुरवण्यासाठी टँकरचा ऑफर
- त्यांचाही जाहीर केलेल्या गावात शेतकऱ्यांच्या शेतीच्या पंपाची वीज जोडणी खंडित न करणे.