Thursday

13-03-2025 Vol 19

आता ठिबक सिंचनसाठी 1 लाख तर तुषार सिंचनसाठी 25 हजार रुपये अनुदान, असा करा ऑनलाइन अर्ज

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Drip Irrigation Subsidy Apply Online | आता सर्व शेतकऱ्यांना माहीतच असेल, की तापमानामध्ये हळूहळू वाढवत आहे. व उन्हाळ्यात या ऋतूला सुरुवात होत आहे. अनेक शेतकऱ्यांच्या मनामध्ये विचार येत असतील, की आपलं पाणी हे कमी होत चाललंय, व यामध्ये काहीतरी उपाय करणे आवश्यक आहे. आपल्या पिकाची नुकसान ही झाली नाही पाहिजे, यासाठी शेतकरी हे मोठ्या चिंतेमध्ये आहे.

शेतकरी हे नेहमी मान्सून वरच अवलंबून राहत असते. त्यामुळे या मान्सूनच्या जीवावरच आपले पीक पेरत असतात. पेरणीसाठी शेतकरी हे पावसाचीच वाट पाहत असतात. यामुळे त्या पिकांना फारसे उत्पन्न भेटत नाही.

याच प्रकारे राज्यात सरकारने आता कृषी सिंचन योजना ही राबवली आहे. या मध्ये या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना हे 75 टक्के ते 80 टक्के अनुदान हे ठिबक आणि तुषार या सिंचनासाठी देत आहे. की तंत्रज्ञानाच्या खर्चाचा बोजा हा शेतकऱ्यांवर जास्त पडणार नाही. नेमके काय आहे ही योजना ? व कसा मिळणार या योजनेचा लाभ तर, जाणून घ्या याबाबतची सविस्तर माहिती.

यामध्ये शेतकऱ्यांच्या रानामध्ये विहीर, वीज, कुंपनलिका, डिझेल व सोलर पंप असे जलस्रोत बसवले असतील, तर सूक्ष्म सिंचन प्रकल्पाचा लाभ हा दिला जाईल…

यामध्ये हेक्टरी नेमका अनुदान हे कसे मिळणार ?


पहा ठिबक सिंचन क्षेत्र


ठिबक सिंचन लॅटरल अंतर ( मी )1.2X0.6

खर्च मर्यादा : 1,27,501 रुपये
अनुदान: 80 % नुसार – 1,2001 रुपये
अनुदान: 75 % नुसार – 95,626 रुपये

बाब: लॅटरल अंतर (मी) 1.5X1.5
खर्च मर्यादा :97,245 रुपये
अनुदान :80% नुसार- 77,796 रुपये
अनुदान:75% नुसार – 72,934 रुपये

बाब: लॅटरल अंतर (मी) 5X5

खर्च मर्यादा : 39,378 रुपये
अनुदान : 80% नुसार – 31,502 रुपये
अनुदान: 75% नुसार – 29,533 रुपये

तुषार सिंचन क्षेत्र

बाब: तुषार सिंचन क्षेत्र ( 1 हेक्टर साठी)

खर्च मर्यादा (75mm) : 24,194 रुपये
अनुदान : 80% नुसार – 19,355
अनुदान : 75% – नुसार – 18,145

आता अर्ज प्रक्रिया पहा

या अर्ज प्रक्रियेमध्ये कोणताही शेतकरी इच्छुक असेल, तर त्याने सरकारी योजनेअंतर्गत आपल्या शेतामध्ये ठिबक व तुषार सिंचन यंत्र नाही बसवायचे असेल तर त्या शेतकऱ्याला महाराष्ट्र राज्य शासनाच्या पोर्टलवर जाऊन हा अर्ज करावा लागेल. यामध्ये तुम्हाला अर्ज करण्यासाठी कोणत्याही प्रकारची कागदपत्र लागणार नाही. जर तुमची लॉटरी लागली तर त्या लॉटरी नंतर तुम्हाला तुमचे कागदपत्रे हे अपलोड करावे लागतील. यामध्ये सर्व कागदपत्रांची ही पडताळणी झाल्यानंतरच तुम्हाला हे अनुदान मिळते.

1) तुम्हाला अर्ज करताना सर्वप्रथम महा डीबीटी पोर्टलवर जाऊन आपला युजर आयडी व पासवर्ड किंवा आधार कार्ड नंबर टाकावा लागेल, हे झाल्यानंतर तुम्हाला ओटीपी येईल तो ओटीपी टाकून तुम्ही लॉगिन करू शकतात.

नंतर तुमच्यासमोर होम पेज येईल, त्या होम पेज वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला ऑप्शन मध्ये अर्ज करा अशी हेडलाईन दाखवेल त्यावर तुम्ही क्लिक करा.

यानंतर तुम्ही अर्ज करा यावर क्लिक केल्यानंतर एक तुम्हाला सिंचन साधने व सुविधा हे ऑप्शन दिसेल व तुम्ही त्याच्यासमोरच प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना असं दाखवेल, त्यावर तुम्ही समोरील बाब निवडून क्लिक करा.

नंतर सिंचन स्रोत हा ऑप्शन दिसेल यामध्ये तुमचं शेतावरील सिंचन स्रोत किंवा ऊर्जा स्रोत तसेच तुमच्याकडे कोणत्याही प्रकारचे सिंचन उपकरण जर आहे. तर त्यावर सिलेक्ट करा. व नंतर खाली जोडा या शब्दावर तुम्ही क्लिक करू शकता. मग तुमचा फॉर्म हा यशस्वीरित्या जतन होईल.

मग तुम्ही तुमचा स्रोत ऍड झालेला तुम्हाला दिसेल व तुम्ही मुख्य पृष्ठ यावर या आणि पुन्हा अर्ज करा. या वर क्लिक करा आणि तुम्हाला परत सिंचन व सुविधा वरील ही बाब निवडा हे दिसेल व यावर क्लिक करा.

ही प्रोसेस झाल्यानंतर तुमच्यासमोर मेन अर्ज ओपन होईल. त्यामध्ये, तुमचे गाव/ तालुका/ गट क्रमांक/ मुख्य घटक/ घटक निवडा/ परिणाम/ काल्पर व्यास या सर्व गोष्टींची काळजीपूर्वक माहिती भरा.

मग खाली तुमचं क्षेत्र हंगाम /पिके /ही माहिती पूर्णपणे भरा.आणि मग तुमचा अर्ज हा सक्सेस होईल

अर्ज पूर्णपणे भरून झाल्यानंतर तुम्हाला दुसऱ्या पेजवर redirect केले जाईल. या पेजवर तुम्हाला make payment ऑप्शन दाखवले जाईल, त्यामध्ये तुम्ही 23.60 रुपयांचं पेमेंट करू शकता.

तुम्हाला पेमेंट करण्यासाठी बरेच ऑप्शन दाखवले जातील. त्यापैकी तुम्हाला ज्या प्रकारे पेमेंट करायचे आहे. ते ऑप्शन निवडून तुम्ही पेमेंट करू शकता.

Rushikesh

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *