Decision For Farmers | आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये, शेतकऱ्यासाठी हे घेतले महत्त्वाचे निर्णय


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Decision For Farmers | आज सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. संध्याकाळच्या सुमारास राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली एक महत्त्वाची बैठक पार पडली.

त्यापैकी मध्ये राज्यातील शेतकऱ्यांसाठी काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत. यामध्ये प्रामुख्याने राज्यातील धान उत्पादक हिरडा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी, तर नाशिक जिल्ह्यातील कळवण तालुक्यातील लघु पाटबंधारे योजनेस मान्यता आणि कृषी पंपाचे जुने ट्रांसफार्मर बदलण्यासाठी निरतर विज योजना राबवण्यास मान्यता दिली आहे.

धान उत्पादकांना प्रोत्साहन पर रक्कम

    राज्यातील दान शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने प्रति हेक्टर 20 हजार रुपये प्रोत्साहन पर रक्कम देण्याचा निर्णय घेतलेला आहे. दोन हेक्टर मर्यादित ही रक्कम शेतकऱ्यांना दिली जाणार आहे. यासाठी राज्य सरकारकडून खरीप हंगामासाठी सोळाशे कोटी रुपये खर्च करण्यात येणार असल्याचे मंत्रिमंडळ बैठकीमध्ये सांगण्यात आलेले आहे.

    हिरडा उत्पादकांना नुकसान भरपाई

    राज्यातील पुणे जिल्ह्यामध्ये आंबेगाव व जुन्नर तालुक्यात निसर्ग चक्रीवादळाने हिरडा उत्पादक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले होते. हीच बाब लक्षात घेऊन मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हिरडा उत्पादकांच्या नुकसान करिता या दोन तालुक्यामधील शेतकऱ्यांना पंधरा कोटी 48 लाख रुपये इतकी नुकसान भरपाई देण्यास मान्यता दिली आहे. या दोन तालुक्यांमध्ये जवळपास सात हजार 66 क्विंटल आसपास हिरडा पिकांचे नुकसान झाले.

    राधानगरी चा कारखाना बीओटी तत्त्वावर

    कोल्हापूर जिल्ह्यामधील राधानगरी तालुक्यात धामोड येथे सह्याद्री कारखाना आहे. हा कारखाना पुढील 24 वर्षाकरिता बांधा वापरा हस्तांतरित कर तत्त्वावर चालवण्यास देण्यास येणार आहे. त्यासाठीचा निविदा लवकरच काढण्यात येणार असून अटी व शर्तीच्या आधारे कंपनीची निवड करण्यात येणार आहे. असा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीमध्ये राज्य सरकारकडून घेण्यात आलेला आहे.

    शेतकऱ्यांसाठी निरंतर वीज योजना

    शेतकऱ्यांना पिकांना पाणी देण्यासाठी नेहमीच मोठ्या संकटाला सामोरे जावे लागते. आता राज्य सरकारकडून मंत्रिमंडळ माहिती मध्ये जुने ट्रान्सफॉर्मर बदलण्यासाठी निरंतर योजना सुरू करण्यास मान्यता दिली आहे.

    या योजनेसाठी राज्य सरकारकडून तब्बल सव्वाशे कोटी रुपयांची आवश्यकता असणार आहे. त्यासाठी 2023-24 या वर्षांमध्ये दोनशे कोटी 2024-25 या वर्षासाठी चारशे कोटी अशा आणि 2025-26 या वर्षासाठी 480 कोटी अशा खर्चास मंत्रिमंडळामध्ये मंजूर देण्यात आली आहे. याशिवाय ट्रान्सफर च ऑनलाईन बदलण्यासाठी देखील 340 कोटीच्या खर्चासाठी या बैठकीमध्ये मान्यता देण्यात आली आहे.

    कळवणच्या लघु पाटबंधारे योजनेस मान्यता

    नाशिक जिल्ह्यामधील कळवण तालुक्यातील जमशेत लघु पाटबंधारे योजनेस मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मंजुरी देण्यात आली आहे. ज्यामुळे आता योजनेच्या माध्यमातून कळवून तालुक्यामधील एक हजार 30 सघमी पाणी साठा व 227 सिंचनाखाली येणार आहे. गिरणा नदी खोऱ्यात जमशेद नालावर ही योजना असणार आहे. जिचे धरण स्थळ हे कळवण पासून 20 किमी अंतरावर असणार आहे.

    Leave a Comment

    error: Content is protected !!