पिक विम्याची अंमलबजावणीत होणार सुधारणा—कृषिमंत्री धनंजय मुंडे, पहा या शेतकऱ्यांना मिळणार पीक विम्याचे पैसे…


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Crop Insurance: नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपला भारत देश आ कृषिप्रधान देश आहे, याबरोबरच याअंतर्गत महाराष्ट्र राज्यात शेतीवर अवलंबून खूप शेतकरी आहेत. चालू वर्षी पाऊस काळ कमी झाल्यामुळे व अवकाळी पावसामुळे शेतीमालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यामुळे शेतकऱ्याच्या उत्पादनातून शेतीसाठी झालेला खर्च देखील निघत नाही. अशा परिस्थितीत शेतकरी आर्थिक दृष्ट्या दुर्बळ झाला आहे.

अशी परिस्थिती उद्भवल्या नंतर शेतकऱ्यांना सावरण्यासाठी सरकारने पिक विमा योजना राबवली होती. यावर्षी सरकारने एक रुपयांमध्ये पिक विमा भरून घेतले होते. ज्या शेतकऱ्यांनी पिक विमा भरला आहे त्या शेतकऱ्यांना लवकरच पिक विमा मिळणार आहे.

राज्यात पिक विमा योजनेला मोठा प्रतिसाद मिळत आहे. तसेच शेतकऱ्यांना पिक विमा योजनेतील अंमलबजावणी मध्ये सुधारणा करण्याच्या इतर पर्यायाचा विचार करण्यासाठी कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी एक समिती नेमण्याचा निर्णय पिक विमा योजनेचा आढावा घेताना झालेल्या बैठकीत घेण्यात आला आहे.

पिक विमा योजनेमध्ये अंमलबजावणी मध्ये येणाऱ्या अडीअडचणी दूर करून ही योजना अजून चांगल्या पद्धतीने कशी राबवता येईल तसेच शेतकऱ्यांना योजनेचा थेट लाभ मिळवून देण्यासाठी इतर पर्यायाचा विचार करण्यासाठी कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी एक बैठक आयोजित केली होती. या बैठकीत कृषी विभागाचे मुख्य सचिव अनुप कुमार, कृषी आयुक्त प्रवीण गेडाम त्याचबरोबर कृषी विभागातील इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

कृषिमंत्री यांनी बैठकीच्या सुरुवातीला चालू हंगामाच्या पिक विम्याचा आढावा घेतला त्यानंतर आधार लिंक नसल्यामुळे तसेच इतर कारणामुळे पीक पिक विमा पासून लाभार्थी वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांच्या याद्या ग्रामपंचायत कार्यालयाच्या बाहेर लावण्याची सूचना कृषिमंत्री यांनी दिली. Crop Insurance

या हंगाम्यात शासनाने एक रुपयात पिक विमा योजना सुरू केली असून या योजनेला शेतकऱ्याचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला आहे. 2016 नंतर सर्वात जास्त पीक विम्याचा लाभ चालू वर्षात म्हणजे 2023 सली शेतकऱ्यांना मिळून दिला आहे. योजनेत असलेल्या त्रुटीमुळे वारंवार लोकप्रतिनिधी व शेतकऱ्याकडून तक्रारी प्राप्त होत आहे.

पिक विम्याची अंमलबजावणी मध्ये येणाऱ्या त्रुटी दूर करण्यासाठी किंवा काही राज्यांनी शेतकऱ्यांना पीक विम्याचा थेट लाभ मिळवून देणाऱ्या इतर पर्यायाचा विचार केला आहे. या इतर पर्यायांमध्ये कार्यपद्धती योजना व अंमलबजावणी याचा अभ्यास करून शासनास शिफारस करण्यासाठी समिती संघटित करावी असे आदेश कृषिमंत्री मुंडे यांनी प्रशासनाला दिले.

कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी या समितीचे कार्य व रचना याबाबत आणखीन काही वेगळ्या सूचना लागू करून एक महिन्याच्या आत शासनास अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले.

हे पण वाचा:- निर्यात बंदी उठवताच कांद्याच्या बाजारभावात झाली मोठी वाढ..! पहा आजचा कांदा बाजार भाव

अश्याच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा

1 thought on “पिक विम्याची अंमलबजावणीत होणार सुधारणा—कृषिमंत्री धनंजय मुंडे, पहा या शेतकऱ्यांना मिळणार पीक विम्याचे पैसे…”

Leave a Comment

error: Content is protected !!