Crop Insurance: शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी..! सव्वा लाख शेतकऱ्यांना 42 कोटी पिक विमा वाटप, पहा तुम्हाला मिळणार का?

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Crop Insurance: नमस्कार शेतकरी मित्रांनो, राज्यातील शेतकरी बांधवांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. चालू खरीप हंगाम्यात वेळेवर पाऊस न झाल्यामुळे, अति पाऊस झाल्यामुळे अशा विविध कारणामुळे शेतकऱ्याचे नुकसान झाले आहे.

जिल्ह्यातील खरीप विमा योजनेत सहभागी झालेले 2 लाख 28 हजार 440 शेतकऱ्यांपैकी 1 लाख 25 हजार 600 शेतकऱ्यांना 42 कोटी 13 लाख 9 हजार रुपये नुकसान भरपाई वाटण्यात आली आहे. मात्र अजूनही 1 लाख 2 हजार 840 शेतकरी नुकसान भरपाई पासून वंचित आहेत. राज्य शासनाने शेतकऱ्यांना केवळ एक रुपया भरून पिक विमा काढण्याची सुविधा उपलब्ध करून दिली होती.

31 जुलै ही पिक विमा भरण्याची अंतिम तारीख होती. या योजनेच्या बऱ्याच शेतकऱ्याने फायदा घेतला आहे. पण काही ग्रामीण भागातील शेतकरी काही अडचणीमुळे पिक विमा भरू शकले नाही. Crop Insurance

पिक विमा भरण्यास ग्रामीण भागात अडचणी

प्रवीण भागातील शेतकऱ्यांना ऑनलाइन अर्ज भरताना सर्व सुविधा तत्पर न मिळाल्याने व कागदपत्रे मिळवताना झालेल्या अडचणीमुळे अनेक शेतकरी पिक विमा पासून वंचित राहिले आहे. सर्वाधिक शिरूर तालुक्यात पिक विमा मिळाला आहे.

पुणे जिल्ह्यातील 2 लाख 28 हजार 441 शेतकऱ्यांनी एकूण 1 लाख 27 हजार 331 हेक्टर क्षेत्राचा पिक विमा काढला होता. यामध्ये सर्वात जास्त शिरूर तालुक्यातील एकूण 39 हजार 975 शेतकऱ्यांनी पिक विमा काढला आहे.

जून-जुलै महिन्यात भात, ज्वारी, बाजरी, नाचणी, तूर, मूग, उडीद, भुईमुगा अशा विविध पिकासाठी पिक विमा योजना राबवण्यात आली होती. पिक विवेक मुळे शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या नुकसानीची भरपाई मिळत आहे. कर्जदार किंवा बिगर कर्जदार शेतकरी, कुळाने अगर भाडेपट्टीने शेती करणारे शेतकऱ्यांना पंतप्रधान पिक विमा योजनेअंतर्गत विमा काढण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

हे पण वाचा:- सोयाबीनच्या बाजार भावात मोठा बदल..! पहा सोयाबीनला आज काय मिळाला भाव?

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन करा

1 thought on “Crop Insurance: शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी..! सव्वा लाख शेतकऱ्यांना 42 कोटी पिक विमा वाटप, पहा तुम्हाला मिळणार का?”

Leave a Comment