Friday

14-03-2025 Vol 19

कापसाच्या दरात मोठी वाढ..! कापसाचे दर 8500 रुपये प्रति क्विंटल? पहा आजचे राज्यातील बाजार भाव

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Cotton Rate Today: नमस्कार शेतकरी मित्रांनो, कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे. राज्यसह देशभरातील बाजार समितीमध्ये सध्या कापूस दरात वाढ सुरू आहे. प्रामुख्याने सर्व स्तरावर कापसाची मागणी वाढल्याने दरातही वाट पाहायला मिळत आहे. आज देऊळगाव बाजार समितीत कापसाला सर्वात जास्त 8200 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे.

राज्यातील सर्व बाजार समितीमध्ये सध्या कापसाला हमीभाव अपेक्षा सरासरी जास्तच दर मिळत आहे. ज्यामुळे मागील काही दिवसापासून शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू दिसत आहे. ज्या शेतकऱ्याला कापूस ठेवायला जागा नाही म्हणून कापूस आधीच विकल्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अशा शेतकऱ्यांना सरकार विषयी राग पाहायला मिळत आहे.

कुठे मिळतोय कापसाला सर्वात जास्त दर?

देऊळगाव बाजार समितीत आज 1700 क्विंटल आवक झाली असून जास्तीत जास्त 8200 ते कमीत कमी 7650 रुपये तर सरासरी 7850 रुपये दर मिळाला आहे. परभणी बाजार समितीत आज 1550 क्विंटल कापसाचे आवक झाली असून जास्तीत जास्त दर 8050 ते कमीत कमी दर 7800 रुपये व सरासरी दर 7950 रुपये मिळाला आहे. अकोला बाजार समितीत आज 94 क्विंटल कापसाची आवक झाली असून, जास्तीत जास्त 8000 रुपये तर कमीत कमी 7400 रुपये व सरासरी 7700 रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला आहे.

पहा आजचे राज्यातील कापूस बाजार भाव | Cotton Rate Today

  • अकोला बाजार समितीत आज 87 क्विंटल कापसाची आवक झाली असून जास्तीत जास्त 7900 रुपये ते कमीत कमी 7300 रुपये तर सरासरी 7600 रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला आहे.
  • सिंदी बाजार समितीत आज 2550 क्विंटल कापसाचे आवक झाली असून जास्तीत जास्त 7850 रुपये ते कमीत कमी 6650 रुपये तर सरासरी 7600 रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला आहे.
  • वरोरा बाजार समितीत आज 360 क्विंटल कापसाची आवक झाली असून जास्तीत जास्त 7600 रुपये ते कमीत कमी 6300 रुपये तर सरासरी 7000 रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला आहे.
  • अमरावती बाजार समितीत आज 75 क्विंटल कापसाची आवक झाली असून जास्तीत जास्त 7500 रुपये ते कमीत कमी 7450 रुपये तर सरासरी 7475 रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला आहे.
  • मारेगाव बाजार समितीत आज 780 क्विंटल कापसाची आवक झाली असून जास्तीत जास्त 7500 रुपये ते कमीत कमी 6750 रुपये तर सरासरी 7150 रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला आहे.
  • उमरेड बाजार समितीत आज 380 क्विंटल कापसाची आवक झाली असून जास्तीत जास्त 7400 रुपये ते कमीत कमी 7000 रुपये तर सरासरी 7200 रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला आहे.
  • काटोल बाजार समितीत आज 160 क्विंटल कापसाची आवक झाली असून जास्तीत जास्त 7300 रुपये ते कमीत कमी 6400 रुपये तर सरासरी 7170 रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला आहे.

बाजारात कापसाची मागणी वाढली

या दरम्यान जागतिक पातळीवर यावर्षी सर्वच प्रमुख कापूस उत्पादक देशांमध्ये उत्पादनात घट झाली आहे. ज्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाची मागणी कायम असून कापूस दरात घसरण होण्याची सध्यातरी कोणतीही शक्यता नाही. सध्या भारतामध्ये शेतकऱ्यांच्या कापसाला सरासरी 7500 रुपये प्रति क्विंटल दर हमखास मिळत आहे.

त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय पातळीवर रुई कापसाला 9000 रुपये दर मिळत आहे. यात आगामी काळात आणखीन वाढ होण्याची शक्यता कापूस बाजारातील तज्ञ सांगत आहेत. च्या शेतकऱ्यांनी अद्याप कापूस घातला नाही त्या शेतकऱ्यांनी आणखीन काही दिवस थांबले तर कापसाला दहा हजार रुपये भाव मिळण्याची शक्यता आहे. कापसाच्या भावात होणारी वाट पाहता शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येत आहे.

हे पण वाचा:- पीएम आवास योजनेचे ₹250000 रुपये खात्यात जमा? 70 लाख कुटुंबांच्या यादीत तुमचे नाव पहा

अश्याच नवनविन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा

Krushna

One thought on “कापसाच्या दरात मोठी वाढ..! कापसाचे दर 8500 रुपये प्रति क्विंटल? पहा आजचे राज्यातील बाजार भाव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *