Cotton Rate | कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक महत्वाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे यंदाच्या हंगामाच्या सुरुवातीला कापूस भाव (Cotton Rate) दबावत होते आणि पुन्हा एकदा वाढू लागले आहेत. या हंगामाच्या शेवटीला पांढरे सोने पुन्हा एकदा चमकू लागले आहे. महाराष्ट्र मध्ये कापसाला पांढरे सोने अशी ओळख आहे. यात पांढरे सोने वरती अनेक शेतकऱ्यांचे अर्थकारण अवलंबून आहे.
मराठवाडा विदर्भ खानदेश या भागामध्ये या पांढऱ्या सोन्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. परंतु या हंगामाच्या सुरुवातीला अपेक्षित असा भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांची मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
यंदा सरासरी पेक्षा कमी पाऊस झाल्याने उत्पादनामध्ये मोठे प्रमाणात घट झाली आहे त्यातच पिकाला योग्य सदर मिळत नसल्याने शेतीला केलेला खर्चही निघला नाही यामुळे शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला आहे.
शेतकऱ्यांना अपेक्षित असा भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी कापूस साठवणूककीला भर दिला. यामुळे बाजारपेठेमध्ये कापसाचे आवक कमी झाली आवक कमी झाल्यामुळे मागणी जास्त वाढली अशा परिस्थितीमध्ये बाजारपेठामध्ये बाजार भाव सुधारणा पाहायला मिळाली आहे.
परंतु मध्यंतरी शेतकऱ्यांना पैशाची निकड असल्याने बहुतांश शेतकऱ्यांना त्यांचा कापूस विक्री करून टाकला आहे. परंतु आता कापसाच्या हंगाम जवळ अंतिम टप्प्यात आला असताना कापसाचा भाव वाढत आहे त्यामुळे शेतकऱ्यांकडे अपेक्षित असा माल नसल्यामुळे शेतकऱ्यांचा याचा फायदा होणार नाही.
सध्या बाजारातली स्थिती पाहता पश्चिम विदर्भामधील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कापसाला सरासरी सात हजार 450 ते 7600 रपये प्रति क्विंटल इतका दर मिळत आहे.
तसेच यंदा केंद्र सरकारने कापसाला सात हजार वीस रुपये इतका हमीभाव जाहीर केला होता. मध्यंतरी कापसाला हमीभावापेक्षा कमी दर मिळत होता परंतु सध्याचे भाव हमीभाव पेक्षा अधिक आहेत त्यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे भाव वाढलेत
आंतरराष्ट्रीय बाजारात कापूस वैद्य आणि प्रत्यक्ष खरेदीत कापसाचे भाव वाढले होते. काल आणि आज सायंकाळपर्यंत इंटर कॉन्टिनेन्टल एक्सचेंज वर कापसाचे वायदे तब्बल पाच टक्के नि वाढले होते. तर प्रत्यक्ष खरेदीतील भाव सुधारला होता. देशातील बाजारातही कापसाचे भाव मागील दोन दिवसांमध्ये क्विंटल मागे पुन्हा शंभर ते दोनशे रुपये वाढले.
त्यामुळे देशातील कापसाचा सरासरी भाव 7500 ते 7800 रुपयांच्या दरम्यान पोहोचला होता. या पुढच्या काळातील कापसाच्या भावा सुधारणा अपेक्षित आहे मग नेमकं कापसाच्या बाहेर पुढील काळात काय परिस्थिती राहू शकते याकडे पाहण्यासारखे राहणार आहे.