Cotton Market | कापूस हे महाराष्ट्रात उत्पादित होणारे नगदी पीक आहे. याचे उत्पादन महाराष्ट्रातल्या मराठवाडा, खानदेश, विदर्भ या भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये घेतले जाते. या भागातील शेतकऱ्यांचे अर्थकारण या पिकावरील अवलंबून आहे. बऱ्याच दिवसापासून बाजारामध्ये मंदीचे सावट दिसून येत आहे. यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने कापूस उत्पादनामध्ये मोठी घट झालेली दिसून येत आहे. त्यामध्ये शेतकऱ्यांना अपेक्षित असा भाव मिळत नसल्याने शेतकरी वर्ग मोठ्या चिंतेमध्ये सापडला आहे.
यंदा सरकारने कापसाला सात हजार दहा रुपये हमीभाव जाहीर केला आहे. परंतु शेतकऱ्यांना हमीभाव पेक्षा कमी दराने कापूस विकावा लागत आहे. यामुळे शेतकरी वर्ग मोठ्या चिंतेमध्ये सापडला आहे. शेतकऱ्यांनी त्यांचा माल घरामध्ये साठवून ठेवला आहे. तज्ञांचे मते कापसामध्ये आवक झाल्यानंतर कापसाचे भाव सुधारतील. परंतु सध्या कापसाला बाजार समितीमध्ये काय भाव मिळतो पाहणे गरजेचे आहे.
आजचे कापुस बाजार भाव पहा
महाराष्ट्रातील हिंगणघाट बाजार समिती प्रतिक्विंटल कापसाला कमीत कमी 6 हजार ते जास्तीत जास्त 7 हजार एकशे वीस रुपये इतका भाव मिळाला आहे. तसेच इथे सर्वसाधारण 6 हजार पाचशे प्रति क्विंटल इतका दर मिळाला आहे.
अकोला बाजार समितीमध्ये झालेल्या लिलावात आज प्रतिक्विंटल कापसाला कमीत कमी सहा हजार पाचशे ऐंशी रुपये ते जास्तीत जास्त सात हजार रुपये इतका दर मिळाला आहे तसेच सर्वसाधारण सहा हजार नऊशे वीस रुपये मिळाला आहे.
अमरावती बाजार समितीमध्ये झालेल्या लिलावात कापसाला कमीत कमी सहा हजार सहाशे ते जास्तीत जास्त सहा हजार सातशे रुपये दर मिळाला आहे. तर इथे सर्वसाधारण सहा हजार पाचशे पन्नास रुपये इतका दर प्रतिक्विंटल कापसाला मिळाला आहे.