Compensation for crop damage : शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण माहिती आहे 11 जिल्ह्यांची नुकसान भरपाई जाहीर झालेली आहे. जूनवा जुलैमध्ये 2023 या कालावधीत पूर परिस्थितीमुळे व अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान भरपाई जाहीर करण्यात आलेली आहे. यामध्ये शेत जमिनीचे देखील मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेले असून त्यासाठी सुद्धा आर्थिक मदत देण्यासाठी निधी वितरण करण्यात आलेला असून या संदर्भात शासन निर्णय देखील जाहीर करण्यात आलेला आहे.
ज्या शेतकरी बांधवांना ही नुकसान भरपाई मिळणार आहे त्याची माहिती पाहणार आहोत. त्या जिल्ह्यांची यादी किती निधी मिळणार आहे या संदर्भात आपण माहिती पाहणार आहोत. कोणत्या जिल्ह्यांकरिता नुकसान भरपाई जाहीर झाली आहे याची यादी देखील आपण खाली खालील प्रमाणे दिलेली आहे.
नुकसान भरपाई 1071 कोटी 77 लाख निधी मंजूर
पूर परिस्थितीमुळे व अतिवृष्टीमुळे झालेले शेतकरी नुकसान भरपाई करण्यासाठी हा निधी वितरित करण्यात आलेला असून शेतकऱ्यांना याचा मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे तर कोणत्या शेतकऱ्यांना हा निधी वितरित करण्यात आलेला आहे व कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हा निधी देण्यात येणार आहे त्याची यादी खाली.
11 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार नुकसान भरपाई
- अमरावती
- अकोला
- यवतमाळ
- बुलढाणा
- वाशिम
- जालना
- परभणी
- हिंगोली
- नांदेड
- बीड
वर दिलेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात येणार असून ज्या शेतकऱ्यांचे नैसर्गिक आपत्तीमुळे शेत पिकाचे नुकसान झाले असल्यास त्यांना हा निधी वितरित करण्यात येणार असून. जर सरकारद्वारे तुम्हाला अनुदान किंवा असेच नुकसान भरपाई मिळवायचे असेल तर तुम्हाला तुमच्या पिकाचे ई – पिक पाहणी करणे आवश्यक आहे. कशाप्रकारे तुम्ही पिकाची ई- पिक कराल ते खाली दिलेल्या तुम्ही पाहू शकता.