Cabinet Meeting Today: नमस्कार मित्रांनो, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बुधवार दिनांक 14 फेब्रुवारी रोजी मंत्रालयात पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. मंत्रिमंडळ बैठकीस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित दादा पवार आणि मंत्रिमंडळातील सर्व सदस्य उपस्थित होते.
मंत्रिमंडळ बैठकीतील महत्त्वाची निर्णय
- मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत सात हजार किलोमीटर रस्ते व पुलाची कामे ऑनलाईन पद्धतीने वाळू, रेतीपुरवठ्यासाठी सर्वक्ष सुधारित रेती धोरण. ना नफा न तोटा तत्वावर वाळू विक्री दर निश्चित करणार.
- शासकीय वैद्यकीय विद्यालयातील इंटर्नशिप विद्यार्थ्यांच्या विद्यावेतनात भराव वाढ. आता विद्यार्थ्यांना मिळणार दरमहा 18 हजार रुपये.
- राज्य शासकीय कर्मचाऱ्यांची मागणी मान्य. आश्वासित प्रगती योजनेत सुधारणा.
- उच्च तंत्रज्ञानाच्या आतिविशाल उद्योगांना प्रोत्साहन देणार. राज्यातील कमी विकसित भागांना फायदा मिळणार.
- सायन कोळीवाड्यातील सिधी निर्वासितांच्या पंचवीस इमारतीचा पुनर्विकास म्हाडा करणार विकास.
- अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांन देण्यात येणारे मॅट्रिक पूर्व शिष्यवृत्ती योजनेसाठी सुधारित मार्गदर्शक सूचना.
- राज्यात जळगाव, लातूर, अमरावती, सांगली, नंदुरबार, गोंदिया या सहा ठिकाणी नर्सिंग विद्यालय होणार.
- औद्योगिक क्षेत्रात पायाभूत सुविधांना प्रोत्साहन देणार. 50% मुद्रक शुल्क सवलत मिळणार.
- भुदरगड तालुक्यात नवीन समाजकार्य विद्यालय होणार. Cabinet Meeting Today
हे पण वाचा:- कोणत्या रेशन कार्डधारकाला किती राशन मिळेल? व कोणत्या राशनकार्डावर राशन मिळत नाही? पहा सविस्तर माहिती