Beneficiary Status | केंद्र सरकार द्वारे सुरू असलेली पी एम किसान योजना ही एक महत्वकांशी योजना आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ देण्यासाठी सरकारकडून सहा हजार रुपयांच्या आर्थिक मदत दिली जाते. याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारने देखील नमो शेतकरी योजनेची अंमलबजावणी केली आहे. या योजनेचा पहिला आत्ता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यात आला आहे. परंतु आता शेतकरी दुसऱ्या हप्त्याची वाट पाहू लागले आहेत. आता हा दुसरा हप्ता शेतकऱ्यांच्या खातवरती कधी जमा होणार हे आपण सविस्तरपणे जाणून घेणार आहोत.
नमो शेतकरी योजना ही राज्य सरकारची महत्वकांशी योजना आहे. 2023 मध्ये या योजनेचे अंमलबजावणी करण्यात आली होती. राज्य सरकारकडून या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ देण्यासाठी सहा हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. ही योजना वर्तमान शिंदे-फडणवीस-पवार सरकारने सुरू केली आहे.
या योजनेचा पहिला हप्ता शेतकऱ्यांना दिवाळी पुर्वी शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यात आला होता. व आता योजनेचा पहिला हप्ता मिळून बराच काळ वाटला आहे. व आता शेतकऱ्यांना असे वाटते की या योजनेचा हप्ता केव्हा जमा होणार असा मोठा सवाल उपस्थित केला जात आहे. या संदर्भात एक माहिती समोर येत आहे.
हाती आलेले मीडिया रिपोर्टनुसार शिंदे सरकारने सुरू केलेले या योजनेअंतर्गत दुसरा हप्ता फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे.
म्हणजे या चालू महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये या योजनेचा दुसऱ्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार आठ फेब्रुवारी ते 10 फेब्रुवारी दरम्यान या योजनेचा दुसरा हप्ता पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यात येईल असा मीडिया रिपोर्ट मध्ये दावा केला जातोय.
तथापि हा फक्त दावाचा आहे, याबाबत सरकारने कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही याबाबत अद्यापही कोणती माहिती समोर आलेली नाही. परंतु मीडिया रिपोर्टनुसार हप्ता आता दहा फेब्रुवारी पर्यंत मिळणार का याकडे विशेष पाहण्यासारखे राहणार आहे.