Pan Card New Updates: भारतीय नागरिकांसाठी पॅन कार्ड अतिशय महत्त्वाचे डॉक्युमेंट आहे. जे त्यांची ओळख म्हणून तसेच आर्थिक व्यवहारातील पात्रता म्हणून वापरले जाते. आर्थिक व्यवहार करताना अनेकदा मोठ्या व्यवहारासाठी पॅन कार्ड द्यावे लागते. पण काही वेळा हे पॅन कार्ड सरकारला परत करावे देखील लागते. पॅन कार्ड बाबतचे नियम आणि प्रक्रिया काय आहे त्याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया. आधार प्रमाणेच पॅन कार्ड देखील अतिशय महत्त्वाचे डॉक्युमेंट आहे. पण जर पॅन कार्ड मध्ये काही चूक झाली किंवा तुमच्याकडे एकापेक्षा जास्त पॅन कार्ड असतील तर तुम्ही काय कराल? अशावेळी तुम्ही पॅन कार्ड सरेंडर करू शकता.
पॅन कार्ड कधी सरेंडर करावे?
जर तुमच्याकडे एकापेक्षा जास्त पॅन कार्ड असतील किंवा तुमचे पॅन कार्ड हरवले असेल तुमचे पॅन कार्ड आयकर विभागाने निष्क्रिय केले असेल तुमचे कार्ड वरील माहिती चुकीची असेल तुमचे पॅन कार्ड एखाद्या कंपनीच्या किंवा फॉर्मच्या नावाने असेल आणि ती कंपनी किंवा फर्म बंद केली तर पॅन कार्ड सिलेंडर करावे लागत आहे. त्याचबरोबर तुमचा मृत्यू झाल्यास पॅन कार्ड सिलेंडर करावे लागते. जर तुम्ही कायमचे भारता बाहेर राहायला जाणारा असाल तर पॅन कार्ड सरेंडर करावे लागते.
दहा हजार दंडापासून वाचवण्यासाठी काय करावे लागेल?
तुम्ही पॅन कार्ड ऑनलाईन किंवा ऑफलाइन दोन्ही पद्धतीने सिलेंडर करू शकता. ऑनलाइन सरेंडर करण्यासाठी एन एफ डी च्या अधिकृत वेबसाईटला जा. त्यानंतर एप्लीकेशन टाइम ड्रॉप डाऊन मध्ये विद्यमान पॅन कार्ड डेटा मध्ये कोणताही बदल नाही पर्यायात बदल किंवा दुरुस्ती निवडा. फॉर्म सबमिट झाल्यानंतर तुमची रिक्वेस्ट रजिस्टर होईल. यानंतर तुमचा ईमेल आयडीवर एक टोकन नंबर पाठवला जाईल. टोकन नंबर लिहून घ्या आणि खाली दिलेल्या कंटिन्यू विथ पॅन एप्लीकेशन या पर्यायावर क्लिक करा. आता एक नवीन पेज उघडेल.
ई-सायन द्वारे स्कॅन केलेले फोटो सबमिट करण्याच्या पर्यायावर निवडा. पेजच्या डाव्या बाजूला तुमच्याकडे ठेवायच्या पॅन कार्डचा तपशील भरा. मागितलेली सर्व माहिती सविस्तर भरा, त्यानंतर नेक्स्ट चा पर्याय निवडा. यानंतर विनंती केलेली कागदपत्रे जसे की फोटो स्वाक्षरी पत्ता ओळखपत्र इत्यादी अपलोड करा. आवश्यक असल्यास पेमेंट करा पेमेंट झाल्यानंतर तुम्हाला डाऊनलोड करण्याची पावती दिसेल ती पावती डाऊनलोड करा आणि सुरक्षित ठेवा. Pan Card New Updates
यानंतर पावतीचे दोन फोटो आणि इतर आवश्यक कागदपत्रासह एन एस डी एल कार्यालयाला पोस्टाने पाठवा. पावती पाठवण्यापूर्वी पाकिटावर पेन रद्द करण्यासाठी अर्ज आणि पावती क्रमांक हे आठवणीने लिहीवा. पॅन कार्ड धारकांच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबीयांना किंवा नातेवाईकांना संबंधित क्षेत्रातील आयकर अधिकाऱ्याला पत्र लिहावे लागेल यामध्ये पॅन कार्ड सिलेंडर आणि मृत्यू दाखला द्यावा लागेल. याशिवाय नाव पॅन कार्ड क्रमांक जन्मतारीख आधी आवश्यक माहिती द्यावी लागेल.
जर तुम्ही भारत सोडून दुसऱ्या देशात जाणार असाल तर पॅन कार्ड मध्ये चुकीची माहिती असेल, पॅन कार्ड हरवले असेल किंवा इतर कोणत्याही परिस्थितीत तुम्ही तुमच्या परिसरातील जवळच्या आयकर अधिकाऱ्याला भेटून ते रद्द करण्यासाठी अर्ज करू शकतात. तुमचे पॅन कार्ड सिलेंडर होण्याअगोदर तुम्ही भारत सोडू शकत नाहीत. अर्ज करताना पॅन कार्ड तुम्ही का सिलेंडर करत आहात यामागील कारण देखील तुम्हाला द्यावे लागेल. तसेच आवश्यक ती सर्व माहिती आणि कागदपत्र द्यावी लागतील.