शेतकऱ्यांना 2109 कोटी रुपयाचा निधी भेटणार, आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील यांची घोषणा…!


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Agriculture News | मागील वर्षांमध्ये शेतकऱ्यांच्या पिकांचे अवकाळी पावसामुळे फारचं नुकसान झाले होते, आणि हे नुकसान शेवटच्या नोव्हेंबर ते डिसेंबर महिन्यामध्ये झाले होते, आणि या अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शेत पिकाच्या नुकसानीसाठी मदत करण्यात येत आहे,

यासाठी 2109 कोटी रुपयांचा निधी देण्यात येणार आहे, हा निर्णय शासन बाबत निर्गमित करण्यासाठी येत असल्याची माहिती, आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील यांनी दिली आहे. तर अनिल पाटील यांनी दिलेल्या निधीची माहिती आपण पाहून घेऊया.

अनिल पाटील यांच्या माहितीस्तव अतिवृष्टी, पूर व चक्रीवादळ यांसारख्या अशा नैसर्गिक आपत्तीमुळे शेत पिकांचे फारच नुकसान झाल्यास पुढील हंगामामध्ये उपयोगी पडण्यासाठी शेतकऱ्यांना अनुदान हे निविष्ठा स्वरूपात म्हणजे, एका हंगामात एक वेळेसच याप्रमाणे, आपली राज्य व आपत्तीला प्रतिसाद निधीमधून विहित दराने चांगल्या प्रकारे मदत देण्यात येते. व महाराष्ट्र राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या काही इतर मान्य बाबींकरिता देखील सुद्धा विहित दराने मदत करण्यात येते.

नोव्हेंबर आणि डिसेंबर या 2023 मधील अवकाळी पाऊस आणि गारपीट यामुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या व त्यापुढील कालावधीसाठी इतर नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या शेत पिकांच्या नुकसानीकरिता सुधारित दराने दोन ऐवजी तीन हेक्टर पर्यंतची मदत देण्याचा शासनाने आता निर्णय घेतलेला आहे. अशी घोषणा आपल्या राज्याचे मुख्यमंत्री ‘एकनाथ शिंदे’ यांनी नागपूरच्या हिवाळी अधिवेशनामध्ये मदतीची म्हणून केली होती.

2023 मधील नोव्हेंबर व डिसेंबर या महिन्यांमध्ये अवकाळी पावसामुळे झालेल्या शेतकऱ्यांच्या पिकांच्या नुकसानीसाठी विभागीय आयुक्त नागपूर, कोकण, अमरावती, पुणे व छत्रपती संभाजीनगर यांच्याकडून या मदतीचे प्रस्ताव आता प्राप्त झालेले आहेत. व या शेतकऱ्यांना मदत आणि दिलासा देण्यासाठी महाराष्ट्र राज्य शासनाने निधी हा वितरित करण्यासाठी मान्यता दिलेली आहे.

यापूर्वी 10 जानेवारी रोजी नाशिक जिल्हा विभागांकरिता 144 कोटी रुपयांचा निधी वितरणास मान्यता दिली, असल्याचेही मंत्री श्री अनिल पाटील यांनी सांगितले आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!