Friday

14-03-2025 Vol 19

कर्जमाफी बाबत एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा !

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Agricultural loan in india | अवकाळी पाऊस तसेच गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीसाठी केवळ 1851 कोटी रुपये देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेमध्ये केली होती. विरोधकांसह सत्ताधारी पक्षाने शेतकऱ्यांच्या प्रश्नावर प्रस्ताव मांडले होते. त्यावर बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोन हेक्टर धानासाठी 15 हजा ऐवजी 20 हजार रुपये देण्याची घोषणा केली.

राज्यामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी कृती दलाची पुनर्रचना करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे असे त्यांनी सांगितले.

छत्रपती शिवाजी महाराज कर्ज माफी योजना पोर्टल सुरू करून 6,500 कोटी रुपयांची कर्जमाफी केली जाणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. संकटात सापडलेले शेतकऱ्यांना लवकरात लवकर दिलासा देणार असल्याचे यावेळी ते म्हणले.

हे पण वाचा: 50 हजार शेतकऱ्यांचे पिककर्ज होणार माफ..! पहा कोणते शेतकरी पात्र आणि कोणते अपात्र?

त्यांच्या सरकारने शेतकऱ्यांना किंवा एक रुपयात पिक विमा देण्याचा निर्णय घेतलेला आहे. पिक विमा घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या 177 टक्के वाढ झालेली आहे. पिक विमा योजनेत विक्रम एक कोटी सत्तर लाख शेतकरी सहभाग घेतला यासाठी राज्य सरकारने 5174 कोटी रुपयांची तरतूद केलेली आहे.

राज्यातील शेतकऱ्यांसाठी सध्या 2 हजार 121 कोटी रुपयांची रक्कम विमा कंपनीने आगाऊ रक्कम म्हणून मंजूर केले आहे. 1217 कोटी रुपयांचे आगाव वाटप करण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. या वेळी त्यांनी माझी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आमदार आदित्य ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. ते म्हणाले आम्ही धरणार जाऊन पाहणी करतो. आम्ही घरी बसून फेसबुकला लाईव्ह करत नाही. अशी जोरदार टीका केली.

अवकाळी पाऊस व गारपीटमुळे झालेल्या नुकसानीची प्राथमिक पंचनामा तयार करण्यात येत आहे. ३२ जिल्ह्यांपैकी २६ जिल्ह्यांचे पंचनामे पूर्ण झाले असून परभणी, अकोला, नागपूर, अमरावती, गोंदिया आणि चंद्रपूर या सहा जिल्ह्यांचे पंचनामे अद्याप प्रलंबित आहेत.

व आतापर्यंत नऊ लाख 75 हजार 59 हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. यासाठी तुम्हाला 2000 कोटी रुपयांची मदत दिली जाणार आहे पंचनामा होताच डीबीटीद्वारे मदत रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये थेट जमा केली जाईल.

Rushikesh

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *