Farmer Success Story : युवा शेतकऱ्याने सिताफळ शेतीचा प्रयोग यशस्वी करून, कमवले लाखो रुपयांचे उत्पन्न


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Farmer Success Story : नोकरीपेक्षा आपली शेतीच बरी असा म्हणणारा युवा वर्ग आता शेतीमधून वेगवेगळे प्रयोग करून वर्षाकाठी चांगले उत्पन्न काढू लागला आहे. शेतकरी वर्ग गेल्या अनेक वर्षापासून शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग करत असल्याचे दिसून येत आहे. अशीच एक गोष्ट शेतकऱ्यांनी साध्य करून दाखवले आहे.

हिंगोली मधील एका शेतकऱ्याने पारंपरिक पिकांना बगल देत सिताफळाची बाग फुलून लाखो रुपयांचे उत्पन्न घेतले आहे. या शेतकऱ्यांनी फुलवलेली सीताफळाची बाग चांगलीच कमालीची ठरली आहे. या शेतकऱ्यांनी शेतातील सीताफळ थेट देशभरात पाठवले आहे. या शेतकऱ्यांनी पारंपारिक शेतीला बगल देत.आधुनिक पद्धतीने शेती करून, उच्च शिक्षित तरुणांनी जिद्द आणि महिने त्याच्या बळावर. सीताफळाच्या बागेतून लाखो रुपयांचे उत्पन्न कमावले आहे.

शेती हवामान आणि बाजार भाव विशेष बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

कधी कोरडा दुष्काळ तर, कधी ओला दुष्काळ यातच शेतीवर वातावरणाचा फटका परिणाम उत्पादन घटून शेतकरी आत्महत्या सारखे पाऊल उचलतात. मात्र, दुष्काळी भाग म्हणून ओळख असलेला सेनगाव तालुक्यातील अतिदुर्गम भागातील युवा शेतकऱ्यांनी आपल्या शेतात सीताफळ बागेची लागवड करून, चमत्कार घडवलेला आहे.

हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यामध्ये असलेला, वरुड चक्रपान येथील युवा शेतकरी बाबुराव लक्ष्मणराव कोटकर यांनी आपल्या शेतात पारंपारिक पिकाला बगल देत एम. एन. के गोल्डन जातीच्या सीताफळाची नवीन व्हरायटी बाग लागवड केली आहे. यातून सध्या ते लाखो रुपयांचे उत्पादन घेत आहेत.

पारंपारिक पिकामध्ये उद्भवणारा धोका बघून न पडवणारा अमाप खर्च बघून त्यांनी आपल्या शेतामध्ये एक एकरावर पंनी तलाव बांधून पाणी व्यवस्थापनाचा प्रश्न मिटवला आहे. 2016 मध्ये गोल्डन सिताफळाची तब्बल एक हेक्टर क्षेत्रावर 14 बाय आठ प्रमाणे आठशे रोपांची लागवड या शेतकऱ्यांनी केली आहे.

पाणी ठिबक व्यवस्था करून व्यवस्थित पाणी नियोजन करत बागेचे संगोपन केले आहे. यामध्ये आंतरपीक म्हणून सोयाबीन, उडीद, मूग व इतर पिकांची लागवड केली जाते. मागील चार वर्षांपासून ते या बागेपासून सिताफळ उत्पादन घेत आहेत.

हैदराबाद, पुणे, वाशी, मुंबई आधी राज्यात मोठ्या मोठ्या मार्केटला या त्यांची सीताफळ विक्रीसाठी नेली जातात. या सीताफळांची टिकवण क्षमता देखील उत्तम असल्याने सिताफळ सहा ते आठ दिवस टिकेल असा विचार करून लांब ठिकाणी पाठवले जातात. बाग लावताना शासकीय योजनेतून मदत झाल्याचे ते सांगतात इतर युवा शेतकरी देखील आपल्या शेतीतून आधुनिक शेतीकडे वळत या पिकांची लागवड करावी अशी त्यांनी यावेळी सांगितले.

1 thought on “Farmer Success Story : युवा शेतकऱ्याने सिताफळ शेतीचा प्रयोग यशस्वी करून, कमवले लाखो रुपयांचे उत्पन्न”

  1. ऑनलाईन वेबसाईट के कारण किसानो को बहोत सी दिकत्तोका सामना करणा पडता है सरकार को एक गुजारीश करता हूं किसानों को कोई भी अनुदान किसानोके बॅक खातो में डायरेक्ट जमा करवाये KYC अपडेट की वेबसाईट हमेशा बंद रहती है और किसानो को दिनभर वहा बेढना पडता है

    Reply

Leave a Comment

error: Content is protected !!