Rain Alert: राज्यातील या भागात बरसणार अवकाळी पाऊस..! उन्हाचा चटका वाढला

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Rain Alert: नमस्कार मित्रांनो, राज्यातील काही भागात पाऊस तर काही भागात वादळ वाऱ्यासोबत अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. काही ठिकाणी ऊन वाढण्याचा अंदाज देखील वर्तवण्यात आला आहे.

राज्यात कुठे पडणार अवकाळी पाऊस जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

महाराष्ट्र राज्यातील काही भागात ढगाळ वातावरण आणि काही भागात कडक ऊन आहे. उन्हामुळे उष्णतेची गर्मी रात्री देखील अनुभवायला मिळत आहे. हवामान विभागाने आज आणि उद्याही राज्यातील काही भागात वादळ वाऱ्यासोबत अवकाळी पाऊस आणि बऱ्याच ठिकाणी ऊन वाढण्याचा अंदाज दिला आहे. तसेच उष्ण रात्रही राहील असा अंदाज दिला आहे. Rain Alert

राज सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि पालघर जिल्ह्यात काही ठिकाणी उष्णतेची लाटेचा इशारा हवामान विभागाने वर्तवला आहे. तर ठाणे, मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील काही ठिकाणी आज आणि उद्या उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. तसेच चांगल्या आणि सोलापूर जिल्ह्यातील काही ठिकाणी उष्णतेचा इशारा देण्यात आला आहे.

उन्हाली बाजरीला या ठिकाणी मिळतोय सर्वाधिक बाजारभाव, पहा आजचा बाजार भाव

मराठवाड्यातील बीड आणि हिंगोली जिल्ह्यात काही ठिकाणी वादळ वाऱ्यासोबत जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. तर नांदेड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यात आज विजा आणि मेघगर्जनासोबत काही ठिकाणी वादळ वारे पावसाचा अंदाज दिला आहे. त्याचबरोबर या ठिकाणी रात्रीची उष्णता ही जास्त राहील असे हवामान विभागाने स्पष्ट सांगितले आहे.

अमरावती, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्यातील काही ठिकाणी विजा आणि मेघगर्जना सोबत वादळी पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तर उद्यापासून राज्यात हवामान कोरडे राहून उन्हाचा चटका वाढण्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा

6 thoughts on “Rain Alert: राज्यातील या भागात बरसणार अवकाळी पाऊस..! उन्हाचा चटका वाढला”

Leave a Comment