या शेतकऱ्यांना मिळणार 50 हजार रुपये, जिल्हा उपनिबंधकांकडून माहिती

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra Agriculture News | राज्यातील पीक कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. जे शेतकरी नियमित कर्ज फेड करीत आहेत त्यांना रतन पर अनुदान देण्याची घोषणा केली होती परंतु प्रोत्साहन अनुदानामध्ये देण्यात आलेले नियम व अटीमुळे शेतकरी वंचित राहिलेले होते. परंतु कोल्हापूर जिल्ह्यातील नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना अनुदान मिळाला नव्हता हा अनुदान मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागली. परंतु आता या गुंतागुंतीचा मार्ग अखेर सुटला आहे.

याबाबत कोल्हापूरचे जिल्हा उपनिबंधक निलकंठ करे म्हणाले की, सहकार विभागणी निश्चित केलेल्या तीन वर्षांपैकी केवळ 2017-18 या वर्षांमध्ये दोनदा उच्चल करणाऱ्या शेतकऱ्यांनाच संख्या एक हजार चारशे इतकी आहे.

यात शेतकऱ्यांना आठ दिवसांमध्ये खात्यावर पैसे राज्य शासनाने या रकमेची आचारसंहितापूर्वीच मान्यता देऊन तरतूद केल्याने त्या आठ दिवसांमध्ये पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होणार आहेत. शासनाकडून पुष्टीकरण मिळालेले आज यादी पाठवत आहे लवकरच शेतकऱ्यांना पैसे मिळण्यासाठी प्रयत्न करणार आहे.

ज्या शेतकऱ्यांनी एकाच वर्षांमध्ये कर्जाची दोन परतफेड केली असेल व एकाच वर्षात दोनदा उचललेली असेल त्या शेतकऱ्यांना ग्राह्य धरायची याबाबत निबंध कार्यालयाने आयुक्तांकडे मार्गदर्शन मागवले होते त्याचे स्पष्टीकरण काल शासनाने दिल्याने शेतकऱ्यांना पैसे मिळवण्यासाठी मार्ग रिकामा झाला आहे.

राज्यातील अनेक शेतकऱ्यांना याचा फायदा झाला असून परंतु कोल्हापूर जिल्ह्यातील उत्पादक शेतकऱ्यांना जास्त असल्याने एका वर्षात दोनदा उचल झल्याने 14 हजार 20079 शेतकरी अपात्र ठरले होते. परंतु यावर शेतकरी संघटनेने याबाबत जोरदार आंदोलन केल्याने शासनाने निकषात बदल करून एकाच वर्षांमध्ये दोनदा उच्चल व परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना लाभ देण्याचा निर्णय घेतलेला आहे.

Leave a Comment