Cotton Market Price | यंदा राज्यामध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने कापूस उत्पादनात घट झालेली आहे. तसेच यंदा कापसाला अपेक्षित असा भाव पण नाही. त्यामुळे शेतकरी वर्ग मोठ्या संकटामध्ये सापडलेला आहे. पिकाला केलेला खर्च हे निघेना त्यातली त्यात सातत्याने वाढणारी महागाई यामुळे शेतकरी कर्जबाजारी होत चालला आहे.
खुल्या बाजारामध्ये सहा हजार आठशे ते सात हजार रुपये प्रति क्विंटल दर आहेत. पैसे झाले तर गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये हे प्रमाण खूपच कमी आहे. मागच्या हंगामामध्ये कापूस दहा हजार रुपये प्रति क्विंटल दराने विकला जात होता.
हे पण वाचा: शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, आता सरसकट शेतकऱ्यांना मिळणार विहिरीचा लाभ !
तज्ञांच्या मते विविध कारणामुळे किमतीवर दबाव आलेला आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर खाद्यतेलाच्या किमतीमध्ये नियंत्रणात आणण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. त्यामुळे कापसाच्या दरावर ही परिणाम झाला आहे. तसेच आंतरराष्ट्रीय कापूस व भावामध्ये घसरण झाले देशांतर्गत दरात घसरण झाली आहे.
देशातील एकूण 130 ला किती रुपये महाराष्ट्र राज्यामध्ये सुमारे 45 लाख हेक्टर कापूस लागवडीखाली आहे. राज्य सरकारने कापसासाठी प्रतिक्विंटल सात हजार वीस रुपये किमान आधारभूत किमती जाहीर केले आहे. पण बाजारातील दर MSP पेक्षा कमी आहेत.
शेती हवामान आणि बाजार भाव विशेष बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा
तसेच यंदा बरेच कापूस खरेदी केंद्र सुरू झालेले नाहीत. भारतीय कॉटन कॉम्पिटिशन ऑफ इंडिया मराठीत केंद्र चालवत आहेत तर फेडरेशन अद्यापि सुरू व्हायचे आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना खुल्या बाजारामध्ये कमी दाराने कापूस विक्री करावा लागत आहे.
वस्त्रोद्योगात घट झाल्यामुळे मागणी कापसाच्या किमती ताण आलेला आहे. कापडात सिंथेटिक फायबर चा वापर वाढल्याने नैसर्गिक कापसाचे मागणी घटली आहे.
तज्ञांच्या मते येता काही दिवसात जर कमी राहतील असे मत व्यक्त केले आहे. आंतरराष्ट्रीय किमतीत सतत कमी होत राहिल्याने मोठी पुनर्प्राप्ती अपेक्षित नाही. खाद्यतेलांवरील सरकारच्या नियंत्रणाचा थेट परिणाम कापसाच्या दरावर होत आहे.
महाराष्ट्र मधील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना या वर्षी त्यांच्या उत्पादनाला माफक दर मिळण्याची शक्यता आहे. नजीकच्या भविष्यात किमतीत रेंज बाउंड आणि एम एस पी च्या खाली राहण्याची अपेक्षा आहे.
आता याकडे पाहणे महत्त्वाचे आहे की, शेतकऱ्यांना अपेक्षित असा भाव मिळतो का नाही? कारण यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने काही भागांमध्ये दुष्काळ परिस्थिती निर्माण झालेली आहे. तर सरकारने या ठिकाणी दुष्काळ सवलती लागू करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यास सुरुवात केली आहे. परंतु सरकारने लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या पांढरा सोन्याला भाव द्यावा. अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.