Petrol And Diesel Rate: महागाई दिवसेंदिवस वाढत आहे आणि याचाच सर्वसामान्यांच्या खिशाला मोठा फटका बसत आहे. सर्वसामान्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. ती म्हणजे गॅस सिलेंडर आणि पेट्रोल डिझेलच्या दरामध्ये होणारी वाढ. खरंतर दिवसेंदिवस होणारी वाढ सर्वसामान्यांना न परवडणारी आहे. आणि याच पार्श्वभूमी वरती आता आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कच्च्या तेलाच्या किमतींना मोठी आपटी खाल्ली, मात्र याचा कोणताही परिणाम देशांतर्गत पेट्रोल डिझेलच्या दरावर दिसून आलेला नाही. आजचा ऑगस्ट रोजी सरकारी तेल कंपनीने जाहीर केलेले नवे दर बघता, देशभरातील बहुतांश शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर कालच्या तुलनेत म्हणजेच जैसे थे वसेस राहिले आहे. Petrol And Diesel Rate
नामांकित शहरातील दर किती?
दिवसेंदिवस वाढत्या महागाईमुळे नागरिकांना मोठा फटका बसत आहे. डिझेल आणि पेट्रोलचे दर वाढले तर नागरिकांना मोठा महागाईचा फटका बसतो. अशातच दिल्ली मध्ये पेट्रोलचे दर अंदाजे 102.20 रुपये प्रतिलिटर डिझेल अंदाजे 95.20 रुपये प्रतिलिटर आहे. तसेच कोलकत्ता येथे पेट्रोल अंदाजे 113.82 रुपये प्रति लिटर आहे.
तसे पाहिले तर भारतातील पेट्रोल डिझेलचे दर केवळ आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या किमतीवर अवलंबून नसतात. यामध्ये डॉलरच्या तुलनेत रुपयाची स्थिती, व मालवाहतूक खर्च, केंद्रीय उत्पादन शुल्क आणि प्रत्येक राज्य सरकारने लावलेला व्हॅट, या सगळ्या घटकांची भर पडते. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत अलीकडे चढ-उतार होत असतानाही देशांतर्गत किरकोळ बाजारातील दर मात्र स्थिर राहिलेले पाहायला मिळतात. अर्थात जागतिक बाजारात मोठी हालचाल झाली असली तरी सरकारने करांच्या रचनेत काही बदल केला नाही, तर येत्या काही दिवसाचे दर बदलण्याची शक्यता नाकारता येत नाही.
गॅस सिलेंडर महाग होणार?
पेट्रोल डिझेल प्रमाणेच लक्षवेधी म्हणजे गॅस सिलेंडर. आपल्या घराचे स्वयंपाक बनवण्यापासून ते हॉटेल, आणि तर व्यवसायामध्ये गॅसची गरज भासते. जर हेच गॅस सिलेंडर महाग झाले तर भविष्यामध्ये इतर गोष्टींवरती इफेक्ट पडतो आणि आपोआप महागाई वाढायला सुरुवात होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय LPG वर प्रति किलोग्रॅम 1.29 रुपये इतका नवा कर लावण्याचा विचार करत आहे. सध्याच्या वापरात विचार करता या करातून सरकारला वार्षिक अंदाजे 460 दशलक्ष डॉलर इतका महसूल मिळू शकतो. मात्र याचा थेट परिणाम म्हणून घरगुती गॅस सिलेंडरची किंमत अंदाजे 18 रुपयांनी वाढण्याची शक्यता आहे. त्याच मिळालेल्या अहवालानुसार मंत्रालयाने नैसर्गिक वायू वर ही प्रति मानक घनमीटर 1.43 रुपये इतका कर प्रस्तावित केला आहे, त्यातून सरकारला वार्षिक अंदाजे 1 अब्ज डॉलर इतका महसूल अपेक्षित आहे.
( टिप: वरील माहिती सूत्रांच्या हवाल्याने समोर आलेल्या अहवालावर आधारित आहे. याबाबत अध्याप अंतिम अधिकृत घोषणा झालेली नाही. पेट्रोल डिझेलचे दर दररोज बदलू शकतात, त्यामुळे नेमक्या दारासाठी स्थानिक पेट्रोल पंपावर किंवा तेल कंपन्यांच्या अधिकृत ॲपवर खात्री करावी.)
हे पण वाचा : पेट्रोल पंपाला आपण डिझेल पंप का म्हणत नाही? कारण वाचून तुम्ही म्हणाल अरे वा!