7th pay commission update : मोदी सरकार केंद्रीय कर्मचाऱ्यांना नवीन वर्षात मोठी भेट देण्याची शक्यता आहे. महागाई भत्ता चार टक्क्यांनी वाढून 50 टक्के होण्याची शक्यता आहे.
मोदी सरकार नव्या वर्षात केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठी भेट देण्याची शक्यता आहे. 2024 च्या सुरुवातीला केंद्र सरकार महागाई भत्ता आणि महागाई सवलत वाढवण्याचा मोठा निर्णय घेऊ शकते. दरवर्षी मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात केंद्र सरकार 48 लाखाहून अधिक केंद्रीय कर्मचारी आणि 68 लाख पेन्शन धारकांना त्यांच्या महागाई भत्त्यात आणि जानेवारी ते जून या महिन्यासाठी महागाई भत्ता वाढवून देते.
केंद्र सरकारला जानेवारी ते जून 2024 या महिन्याच्या महागाई भत्त्यातही वाढ करण्याची गरज आहे. पण 2024 मध्ये महागाई भत्त्यात वाढ करण्याचा निर्णय मोदी सरकार मार्च महिन्यात नव्हे तर नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच घेऊ शकते. कारण पुढील वर्षी एप्रिल ते मे दरम्यान लोकसभा निवडणुका होणार आहेत.
महागाई भत्त्यात 4 टक्क्यांची वाढ होण्याची शक्यता : केंद्र सरकार आपल्या कर्मचाऱ्यांना नवीन वर्षाच्या निमित्ताने महागाई भत्त्यात वाढीची भेट देऊ शकते. केंद्र सरकार दरवर्षी जानेवारी आणि जुलैमध्ये वर्षातून दोनदा डीए वाढवते. AICPI डेटानुसार सरकार सातव्या वेतन आयोगांतर्गत केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ करते.
त्यामुळे कर्मचाऱ्यांचा डीए कधी 3 टक्के तर कधी 4 टक्क्यांनी वाढतो. आता नवीन वर्षात महागाई भत्त्याच्या टक्क्यांनी वाढ होऊन महागाई भत्ता 50% होण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारने दिवाळीपूर्वीच केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात चार टक्के वाढ केलें आहे. त्यामुळे सध्या महागाई पत्ता 46% आहे.
महागाई सवलती ही वाढवण्याची शक्यता.
सरकारकडून केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता सोबतच पेन्शन धारकांच्या महागाई सवलतीतही वाढ केले जाते. डीए आणि डी आर मधील या वाढीचा थेट परिणाम कर्मचाऱ्यांच्या पगारावर आणि पेन्शन धारकांच्या मासिक पेन्शन वर होतो. सध्या सातव्या वेतन आयोगांतर्गत कर्मचारी आणि पेन्शन धारकांना 46 टक्के डीए आणि डी आर दिला जात आहे. सरकारने महागाई भत्ता 4% ने वाढवला तर महागाई भत्ता आणि सवलत 46 टक्क्यांवरून 50 टक्के होईल.
4 टक्क्यांची वाढ होण्याची शक्यता.
केंद्र सरकारचे कर्मचारी आणि पेन्शन धारकांना महागाई भत्ता आणि महागाई सवलती 4 टक्के वाढ होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत डीए आणि डी आर 50% पर्यंत वाढवल्यास कर्मचाऱ्यांच्या पगारात आणि पेन्शन धारकांच्या पेन्शनमध्ये वाढ होईल. या वाढीनंतर कर्मचाऱ्यांचे किमान वेतन 9 हजार रुपयांनी वाढणार आहे. सरकार ही वाढ जानेवारी ते फेब्रुवारी किंवा मार्चनंतर वाढवू शकते.
डीए मूळ वेतनात सामील होईल?
महागाई भत्ता 50% पर्यंत पोहोचल्यानंतर तो मूळ वेतनात एकत्र होईल आणि महागाई भत्ता शून्य होईल, आणि महागाई भत्त्यात नव्याने वाढ होईल. असा दावा अनेक अहवालांमध्ये सातत्याने केला जात आहे. पण असं होणार नाही कारण सातव्या वेतन आयोगाने 50% महागाई भत्ता असल्यास मूळ वेतनात विलीन करण्याची शिफारस केलेली नाही. सहाव्या वेतन आयोगाने ही अशी कोणतीही शिफारस केलेली नाही. दरम्यान 50 टक्के महागाई भत्त्यानंतर सरकार आठवा वेतन आयोग स्थापन करण्यात येणार का? असा प्रश्न निर्माण सध्या उपस्थित होत आहे.