Weather Today India | राज्यातील शेतकऱ्यांसाठी व नागरिकांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली आहे. येत्या काही दिवसांमध्ये राज्यामध्ये पावसाचा इशारा हवामान विभागाने वर्तवलेला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यामध्ये कुठे मुसळधार पाऊस तर कुठे गारपीट होणार आहे. ही सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत
राज्याच्या हवामानामध्ये सातत्याने होणारा बदल शेतकऱ्यांसाठी चिंताजनक ठरत आहे. नोव्हेंबर महिन्याच्या शेवटी राज्यामध्ये अचानक आलेल्या अवकाळी पावसाने व गारपीटीने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान केले होते.शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेला घास निसर्गाच्या लहरीपणामुळे मातीमोल झाला होता.
हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजामध्ये काही भागात गारपीट तसेच मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज वर्तवला आहे. तसेच राज्याच्या काही भागात तुरळक पाऊस पडेल असा अंदाज देखील दिलेला आहे. व यासोबत देशभरामध्ये थंडीचा जोर देखील वाढण्याची शक्यता आहे. तसेच इतर काही राज्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे.
हरियाणा, दिल्ली, पंजाब तसेच राजस्थानमध्ये हलके ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल. तर उत्तर प्रदेशात ही पाऊस हजेरी लावताना पाहायला मिळेल. तसेच उत्तर भारतामध्ये थंडीची लाट कायम राहणार आहे.
वेस्टर्न डिस्टर्बनस च्या प्रभावामुळे अनेक राज्यामध्ये मुसळधार पाऊस आणि गारपीट होणार असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यासोबत महाराष्ट्रातील पावसाचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेला आहे.
राज्याच्या काही भागामध्ये तुरळ पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवलेला आहे. यानंतर देशामध्ये थंडीचा जोर वाढणार आहे तर काही भागांमध्ये मुसळधार पाऊस येण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे.