Voter ID | मतदान ओळखपत्र हे अत्यंत महत्त्वाचे डॉक्युमेंट आहे. तुमचे मतदान कार्ड हरवले किंवा खराब झाले आहे तर अशा प्रकारे तुम्ही काढू शकणार आहात तुमचे नवीन मतदान ओळखपत्र.
मित्रांनो मतदान ओळखपत्र हे अत्यंत महत्त्वाचे दस्तावेज आहे. आपल्याला मतदानाचा अधिकार हे मतदान ओळखपत्रद्वारे देण्यात येतो. हे ओळखपत्र निवडणूक आयोगाने जारी केली आहे जेणेकरून तुम्ही तुमचा मतदान ओळखपत्र दाखवून तुमचे मतदान अधिकार नोंदवू शकता. मतदान ओळखपत्र मध्ये तुमचे नाव ,तुमचा फोटो ,तुमचा संपूर्ण पत्ता, तुमची जन्मतारीख, इत्यादी माहितीचा समावेश असतो.
ही सर्व माहिती तपासल्यानंतर तुम्ही निवडणुकीत मतदान करू शकता. व इतर सरकारी योजना चा लाभ देखील घेऊ शकता त्याचप्रमाणे मतदान ओळखपत्र ने तुम्ही तुमचे बँक अकाउंट उघडू शकता व इतर महत्त्वपूर्ण डॉक्युमेंट सुद्धा बनू शकता. पण तुम्हाला माहित आहे की तुमचे मतदान कार्ड हरवल्यानंतर तुम्ही आता ऑनलाईन प्रक्रिया द्वारे डुबलीकेट प्रत बनवू शकता.
तुमची मतदान कार्ड हरवले असेल तर नवीन मतदान कार्ड बनवण्यासाठी खालील दिलेल्या स्टेप फॉलो करा :
1 .सर्वप्रथम तुम्ही निवडणूक आयोगाच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या, अधिकृत वेबसाईटवर जाण्यासाठी येथे क्लिक करा . https://mahasec.maharashtra.gov.in/
2.यानंतर तुम्हाला तिथे ऑनलाईन सेवा हा पर्याय दिसेल या पर्यायावर क्लिक करा
3.या पर्यायावर क्लिक केल्यानंतर, तुमच्यासमोर मतदान ओळखपत्रासाठी अर्ज करा असं दिसेल यावर क्लिक करा.
4.यानंतर तुमचे राज्य निवडा
5.त्यानंतर तुमचा मतदान नोंदणी क्रमांक दिलेला जागेवर भरा.
6.आता तुमचा आधार क्रमांक टाका
7.तुमच्या लिंक असलेल्या मोबाईल नंबर वर एक ओटीपी प्राप्त होईल.
8.OTP दिलेल्या बॉक्समध्ये भरा.
9.ओटीपी भरल्यानंतर तुमच्यासमोर काही माहिती दिसेल त्या ठिकाणी योग्य माहिती भरा.
10.सर्व माहिती भरल्यानंतर योग्य कागदपत्रे अपलोड करा.
11.सर्व कागदपत्रे अपडेट केल्यानंतर अर्ज समिट करा.
मतदान ओळखपत्र साठी शुल्क :
जर तुमचे मतदान ओळखपत्र खराब किंवा हरवले असेल व तुम्ही नवीन मतदान ओळखपत्र साठी अर्ज केला असेल तर या नवीन मतदान ओळखपत्र कोणताही शुल्क नाही.
आवश्यक कागदपत्रे :
- सर्वप्रथम तुम्हाला पासपोर्ट आकाराचा फोटो लागेल
- ओळखपत्राची प्रत : आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, किंवा पॅन कार्ड
- रहिवासी पुरावा : विज बिल
हे पण वाचा: बँकेचा नवीन नियम होणार लागू, 1 फेब्रुवारीपासून काढताना येणार एवढेच पैसे