Tur Rate Today: नमस्कार शेतकरी मित्रांनो, राज्य सध्या तुरीच्या दरात चांगलीच वाढ होताना दिसून येत आहे. तुरीचे दर बारा हजार रुपये प्रति क्विंटल पर्यंत पोहोचले असून मागील दहा ते बारा दिवसांमध्ये तुरीने हा दरवाढीचा टप्पा गाठला आहे. सामान्यपणे मार्च महिन्याच्या आखेरीस कमाल दहा हजार चारशे रुपये प्रति क्विंटल पर्यंत असलेले तुरीचे दर सध्या कमाल 12 हजार रुपये प्रति क्विंटल पर्यंत पोहोचले आहेत.
तुरीला सर्वात जास्त दर कुठे मिळाला?
वाशिम जिल्ह्यातील कारंजा बाजार समितीत तुरीला कमीत कमी 9900 रुपये प्रतिक्विंटल तर जास्तीत जास्त 12000 हजार रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे तर सरासरी 11300 रुपये प्रति क्विंटलचा दर या ठिकाणी मिळाला आहे. वर्धा जिल्ह्यातील सिंधी बाजार समितीमध्ये जास्तीत जास्त 11800 ते कमीत कमी 9950 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला तर सरासरी 10000 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे.
कांद्याच्या भावात मोठी घसरण, निर्यात बंदी मुळे शेतकऱ्याचे झाले मोठे नुकसान पहा आजचा बाजार भाव
लातूर जिल्ह्यातील उदगीर बाजार समितीत जास्तीत जास्त 11800 ते कमीत कमी 10500 तर सरासरी 11150 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे. अकोला जिल्ह्यातील लोहारा बाजार समितीत जास्तीत जास्त 11750 रुपये ते कमीत कमी 10500 रुपये तर सरासरी 11300 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे. अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर बाजार समितीत जास्तीत जास्त 11600 ते कमीत कमी 9500 तर सरासरी 11200 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे.
लातूर जिल्ह्यातील वरात शहाजानी बाजार समितीत जास्तीत जास्त 11400 ते कमीत कमी 10700 रुपये तर सरासरी 11050 रुपये प्रति क्विंटल एवढा दर मिळाला आहे. वर्धा जिल्ह्यातील आर्वी बाजार समितीत जास्तीत जास्त 11340 ते कमीत कमी 9000 रुपये तर सरासरी 10000 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे. Tur Rate Today
राज्यातील 6 लाख गाय दूध उत्पादकांना 91 कोटीचे अनुदान जमा, यादीत तुमचे नाव पहा
या बाजार समितीत मिळत आहे 11000 पेक्षा जास्त दर
सध्या मुरूम (धाराशिव), अकोला, अमरावती, चिखली, नागपूर, पाचोरा, सावनेर, तेल्हारा, उमरगा, नेर परसोपंत, दुधनी उमरेड या राज्यातील प्रमुख बाजार समितीमध्ये तुरीला 11000 रुपये प्रति क्विंटल पेक्षा जास्त दर मिळत आहे. तर काही निवडक चार ते पाच बाजार समिती मध्ये सोडता उर्वरित सर्व बाजार समितीमध्ये तुरीला कमीत कमी 10000 ते जास्तीत जास्त अकरा हजार रुपये प्रति क्विंटल दर मिळत आहे.
कसा गेला हा हंगाम?
सोयाबीन आणि कांदा उत्पादक शेतकरी योग्य दर मिळत नसल्याने, यंदा मोठ्या चिंतेत आहेत. मात्र तुरीचे दर यावर्षी सुरुवातीपासूनच शेतकऱ्यांना मोठा धीर देणारे होते. यावर्षी जानेवारी 2024 या महिन्याच्या शेवटपर्यंत तुरीचे दर सरासरी आठ हजार ते नऊ हजार रुपये प्रति क्विंटल च्या दरम्यान पाहायला मिळत होती. मात्र यानंतर दरात झालेली वाढ अजूनही टिकून आहे. मध्यंतरी दोन महिने तुरीचे दर 10500 रुपये प्रतिक्विंटल पर्यंत स्थिरावले होते. मात्र आता आवक कमी झाल्याने तुरीच्या दारात पुन्हा एकदा मोठी वाढ पाहायला मिळत आहे. सध्या राज्यातील अनेक बाजार समितीमध्ये तुरीला अकरा हजार रुपयांच्या पुढे भाव मिळत असून, काही बाजार समितीमध्ये 12000 रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला आहे.
दरवाढी मागील कारण काय आहे?
सध्याच्या स्थितीला राज्यातील सर्वच बाजार समितीमध्ये तुरीच्या व घटले आहे विशेष म्हणजे उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये बऱ्याच ग्रहणी या वर्षभराची तुरीची दाळी सह अन्य डाळीची तजबीज करून ठेवत असतात. यामुळे या कालावधीतील त्या त्या डाळ वर्गीय पिकांना मागणी असते. अशातच सध्या हंगामा ही शेवटला आला असून शेतकऱ्याकडील गुणवत्ता पूर्ण तुरीच्या आवक कमी झाली आहे. याच्या परिणाम तुर बाजारभावात झाला आहे.