आंतरवाली ते मुंबई पायी दिंडीचा मार्ग ठरला, ‘या’ गावातून जाणार मोर्चा

0
Manoj Jarange

Manoj Jarange

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Manoj Jarange : मराठा समाजाला सरसकट ओबीसी मधून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी म्हणून जरांगे मुंबईचे आझाद मैदानावर उपोषण करणार असून, मुंबई दौरा कसा असणार याची रूपरेषा जाहीर करण्यात आली आहे. 20 जानेवारीला अंतरवाली सराटीमधून सकाळी नऊ वाजता पायी दिंडी मुंबईकडे निघणार असल्याचे जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले आहे. तर अंतरवाली सराटी-अहमदनगर-पुणे मार्गे मुंबईला ही पायी दिंडी पोहोचणार आहे.

मनोज जरांगे यांनी दिलेल्या माहितीनुसार जालना, शहागड, गेवराई (बीड), अहमदनगर, शिरूर, शिक्रापूर, रांजणगाव, खराडी, शिवाजीनगर, पुणे अशी दिंडी पोहोचेल. त्यानंतर पुढे पुणे मुंबई हायवे, लोणावळा, पनवेल वाशी, चेंबूर मार्गे आझाद मैदान वर हि पाई दिंडी पोहोचणार आहे. दिंडीच्या आसपासच्या गावातील लोक त्या त्या ठिकाणी दिंडीत सहभागी होतील. सगळ्या नियोजनाचा पीडीएफ तयार करून कार्यकर्त्यांना व्हाट्सअप च्या माध्यमातून पाठवण्यात येणार असल्याची माहिती जरांगे यांनी दिली आहे.

मनोज जरांगे पाटिल यांच्या सूचना…..

दरम्यान याचवेळी मनोज जरांगे यांनी काही महत्त्वाच्या सूचना देखील दिले आहेत. ज्यात शांततेत दिंडी असेल फोटो काढण्यासाठी गर्दी करू नका. ज्या तुकडीत तुम्हाला दिली आहे. त्याच तुकडीत रहा आपल्या प्रत्येक गाडी दोन स्वयंसेवक ठेवा. तसेच मुंबईतल्या सर्व मराठा बांधवांना विनंती आहे की गट करू नका असेही जरांगे म्हणाले आहेत.

दिंडीच्या गावातून जाणार आहे, त्या गावाच्या परिसरातील नागरिकांनी त्याच गावाच्या ठिकाणी जमा व्हावेत तिथून पुढे एकत्र प्रवास करावा. तसेच ज्या गावातून लोक मुंबईला जात आहेत.त्या गावातील लोकांनी मुंबईला जाणाऱ्या सर्व लोकांना रस्त्यात लागणाऱ्या खाण्यापिण्याची व्यवस्था करावी गावकऱ्यांनी एकत्र येऊन त्यांना होईल तेवढी मदत करावी. असे आवाहन जरांगे पाटील यांनी केले आहे. सोबतच मुंबईला जाण्यासाठी तुकडे केला जाणार असून प्रत्येक तुकडीतल्या लोकांनी आपापली जेवणाची जेवणाची खाण्याची सोय करावी. जे वाहन सोबत असणार आहे. त्याला घरासारखं बनवावे तसेच आपापल्या तुकडीत कोण आहे. त्यावर लक्ष ठेवावे कोण वेडेवाकडे लक्ष द्या दिंडीत कुणीही व्यसन करणार नाही यावर लक्ष ठेवावे, असेही जरांगे पाटील म्हणाले..

तर शेतकऱ्यांपासून श्रीमंत मराठ्यांपर्यंत सर्वांनी या दिंडीमध्ये सामील व्हावे, असे जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला आव्हान केले आहे. अजून या यात्रेला नाव देणे बाकी आहे. तर अर्धा क्विंटल ज्वारी बाजरी गहू तांदूळ सोबत घ्यावे टॉर्च मोबाईल चार्जर कपडे साबण दूध पावडर, सरपन, तवा पातील सर्वकाही सोबत घेऊन चला ऊसतोड करायला चाललो, समजून सर्व संसार सोबत घ्या असे, आव्हान जरांगे पाटील यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!