RBI चा मोठा दणका : स्टेट बँकेला पावणे दोन कोटींचा दंड, ग्राहकांची फसवणूक थांबवण्यासाठी रिझर्व्ह बँकेचा कठोर निर्णय

0
RBI Banking News

RBI Banking News

RBI Banking News : जगात सर्वात मोठ्या लोकशाहीत ग्राहकांच्या हक्कांची राखीव बॅंका सुद्धा पाळत नाहीत, हे आता पुन्हा एकदा समोर आलं आहे. देशातील सर्वसामान्य माणूस, ज्याने आपल्या रक्ताचा थेंब थेंब साठवून बँकेत ठेवलेली पुंजी विश्वासाने तिथं सोपवलेली असते त्याचाच विश्वास डावलला गेला. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) आणि जन स्मॉल फायनान्स बँक या दोघांनाही जबर दंड ठोठावत मोठा इशारा दिला आहे. या बँकांनी बँकिंग नियमांचं सर्रास उल्लंघन केल्याचं उघड झालं आहे आणि त्यामुळे ग्राहकांचा विश्वास हादरला आहे.RBI Banking News

RBI च्या तपासणीत स्पष्ट झालं की, स्टेट बँक ऑफ इंडिया कडून कर्जवाटप, अग्रिम देणे, वैधानिक मर्यादा पाळणे, चालू खाती उघडताना घेण्यात येणारी काळजी, ग्राहक संरक्षण यासारख्या बाबतीत गंभीर त्रुटी झाल्या आहेत. विशेषत: इलेक्ट्रॉनिक व्यवहारांमध्ये ग्राहकांना नुकसान झाल्यास बँकांनी ते कसं भरून द्यायचं याचे नियम स्पष्ट असतानाही, त्याचे पालन करण्यात SBI चुकली. याचाच फटका आता बँकेला तब्बल 1 कोटी 72 लाख 80 हजार रुपयांचा दंड म्हणून बसलाय.

फक्त SBI नव्हे, तर जन स्मॉल फायनान्स बँकसुद्धा RBI च्या नियमानुसार वागत नाही, असंही या तपासणीत निष्पन्न झालं. या बँकेने बँकिंग नियमन अधिनियम, 1949 च्या अनेक तरतुदींचं उल्लंघन केलं. म्हणून RBI ने 1 कोटी रुपयांचा दंड जन बँकेवर ठोठावला आहे. या निर्णयामुळे बँकिंग क्षेत्रात पारदर्शकता आणण्यासाठी RBI आता अधिक सक्रिय झाल्याचं दिसतंय.

ग्रामीण भागातील नागरिक, शेतकरी, लहान व्यावसायिक हे आजही बँकांच्या सूचनांवर डोळे झाकून विश्वास ठेवतात. पण जेव्हा देशातील सर्वात मोठी बँकसुद्धा नियम तोडते, तेव्हा सामान्य माणसाच्या डोळ्यात प्रश्नांची धग उसळते – “आपण कुणावर विश्वास ठेवायचा?” ही कारवाई म्हणजे केवळ आर्थिक दंड नसून, जनतेच्या सुरक्षिततेसाठी आरबीआयचा उठवलेला इशारा आहे.

हे पण वाचा : भारतीय रिझर्व्ह बँकेकडून मोठी बातमी! या बँकेचा परवाना रद्द, या बँकेत तुमचे खाते आसेल तर लगेच करा बंद..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!