Thursday

13-03-2025 Vol 19

Ration Card News: या जिल्ह्यातील पावणेदोन लाख रेशन कार्ड धारक महिलांना मिळणार मोफत साडी..!

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ration Card News: नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यात अंत्योदय रेशन कार्ड धारकांना मोफत साडी वाटण्यासाठी जिल्ह्यात एक लाख 46 हजार साड्या दाखल झाल्या आहे. 2610 रेशन दुकानांमध्ये या साड्याचे वाटप होणार आहे. यामध्ये लाल हिरवा पिवळा व निळ्या रंगाच्या साड्या उपलब्ध असताना एकाच रंगाच्या साडीची मागणी होत असल्याने रेशन दुकानदाराचे मोठे टेन्शन वाढले आहे.

आपले सरकार नागरिकांसाठी नेमहीच नवनविन योजना राबवत आसते . राज्यांतील अंत्योदय रेशन कार्डधारकांना वर्षातून एकदा मोफत साडी दिली जात आहे. आत्तापर्यंत 60515 कुटुंबांना साडी उपलब्ध करून देण्यात आली आहे. येत्या काही दिवसात लोकसभा निवडणुकीमुळे आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास आचारसंहितेत साडीवाटप अडकणार आहे.

त्यामुळे साड्या उपलब्ध झाल्यानंतर लगेच त्या लाभार्थी कुटुंबियापर्यंत पोहोचवण्यात यावेत. अशी सूचना पुरवठा विभागाने रेशन दुकानदारांना दिल्या आहेत. परंतु साड्या घेण्यासाठी दुकानात येणाऱ्या लाभार्थी विशेषता महिलांकडून साडेचार रंगासाठी आग्रह धरला जात आहे. यामुळे मोफत साडी चे वितरण करणे रेशन दुकानदारासाठी अवघड जात आहे.

पहा कोणत्या तालुक्यात किती साड्या मिळाल्या?

बागलाण : 13120

चांदवड : 6230

देवळा : 5090

दिंडोरी :13145

मालेगाव शहर : 16605

नाशिक शहर : 105115

इगतपुरी : 10690

कळवण : 8651

मालेगाव : 11250

नांदगाव : 5275

मनमाड : 3300

नाशिक : 8630

निफाड : 10800

पेठ :10845 Ration Card News

सिन्नर : 8065

सुरगाणा : 15330

त्र्यंबकेश्वर : 8885

येवला : 10050

अंत्योदय रेशन कार्डधारकांना ही योजना मिळत असली तरी काही रेशन कार्डधारक साडीची मागणी करत आहेत. शासनाने सरसकट प्राधान्य व अंत्योदय रेशन कार्डधारकांना साड्याचे वितरण करून रेशन दुकानदारांना दिलासा द्यावा. असे रेशनदार दुकानदाराचे म्हणणे आहे.

हे पण वाचा:- उद्यापासून पुन्हा होणारा अवकाळी पाऊस..! पहा कोठे पडणार?

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा

हा लेख शेवट पर्यंत वाचल्या बदल धन्यवाद…

Krushna

One thought on “Ration Card News: या जिल्ह्यातील पावणेदोन लाख रेशन कार्ड धारक महिलांना मिळणार मोफत साडी..!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *