PunjabRao Dak : मान्सून काळात महाराष्ट्राकडे पाठ फिरवलेल्या पावसाने गेल्यां महिन्यापासून महाराष्ट्रात हाहाकार वाजवला आहे. गेल्या महिन्यात झालेल्या जोरदार अवकाळी पावसामुळे व गारपीटीमुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे फारच नुकसान झाले आहे.
पण या चालू महिन्यात पावसाचा जोर कमी झाला आहे. मात्र रिमझिम पावसामुळे देखील रब्बी पिकांचे आणि फळ पिकांचे फारच नुकसान झाले. शेतकऱ्यांनी असे सांगितले.
अशातच गेल्या दोन दिवसांपासून हवामानात थोडासा बदलं झालेला दिसून येतोयं काही ठिकाणी ढगाळ हवामान तर काही ठिकाणी कुठे थंडी पडत आहे.
आता, ज्येष्ठ हवामान अभ्यासात पंजाबराव डख यांनी देखील एक नवीन हवामान अंदाज वर्तवला आहे. पंजाबराव यांनी आजपासून अर्थातच, म्हणजेच 9 डिसेंबर २०२३ पासून विदर्भ आणि मराठवाड्यात हवामान हे प्रामुख्याने कोरडे राहणारं असा अंदाज त्यांनी वर्तवला आहे.
आता हळूहळू राज्यात थंडीला सुरुवात होणार आहे. यंदा मार्च 2024 पर्यंत थंडी पडणार असा इशारा त्यांनी दिला आहे.
यामुळे आता रब्बी हंगामातील पिकांना पोषक वातावरण मिळणार आहे. त्यामुळे रब्बी हंगामातील पिके पुन्हा एकदा नवीन उभारी घेतील, आणि पिकांची चांगली वाढ होईल अशी आशा आहे.
राज्यात आता थंडीला सुरुवात होणार, असल्याने स्वेटर, मपलर यांसारख्या उबदार कपड्यांना कपाटातून बाहेरं काढावे लागणारं आहे. कडाक्याची थंडी अजूनही पडलेली नाही. अजून येत्या काही दिवसात थंडीचा जोर जास्तच पडेल.
आजपासून हवामान कोरडे होणारं असले, आणि थंडीला सुरुवात होणार असली तरी, देखील डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पुन्हा एकदा वातावरणात बदल होणार.
डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात पुन्हा एकदा एक पाऊसं पडेल. असा अंदाज पंजाबराव यांनी वर्तवला आहे. एवढेच नाही तर नवीन वर्षाच्या सुरुवातीला देखील पावसाची हजेरी लागणार आहे.
नवीन वर्षाच्यां सुरुवातीलाचं अर्थात म्हणजे जानेवारी 2024 मध्ये पुन्हा एकदा अवकाळी पावसाची हजेरी लागू शकते. असा अंदाज पंजाबरावांनी वर्तवला आहे. त्यामुळे पंजाबराव डख यांचा हा हवामान अंदाज खरा ठरतो का, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहणार आहे.