पोस्ट ऑफिस मध्ये नोकरीची सुवर्णसंधी; पात्रता, वयोमर्यादा, अंतिम तारीख आणि अर्ज कसा करावा? पहा सविस्तर..

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Post Office Requirement: सरकारी नोकरीच्या शोधत असलेल्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. भारतीय भारतीय डाक विभागात स्टाफ कार ड्रायव्हर पदासाठी भरती निघाली आहे. इच्छुक उमेदवारांसाठी नोकरी ला लागण्याची सुवर्णसंधी आहे. त्यामुळे विचार न करता लगेच या पदासाठी अर्ज करा. पोस्ट ऑफिसच्या या भरती अंतर्गत एकूण 25 रिक्त पदे भरले जाणार आहेत. पोस्ट ऑफिस च वेगवेगळ्या भागांमध्ये या पदांची वाटणी करण्यात आलेली आहे. त्यानुसार सेंट्रल रीजनमध्ये एक, एम एम एस चेन्नई इथे 15, साउथ रिजन मध्ये चार आणि वेस्टर्न रिजन मध्ये पाच रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

पात्रता व अटी

  • उमेदवारांनी दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
  • उमेदवाराकडे वाहन चालवायचे लायसन असणे आवश्यक आहे.
  • किमान तीन वर्षाचा ड्रायव्हिंग अनुभव असणे आवश्यक आहे.
  • अर्जदाराचे वय 56 वर्षाच्या आत असणे आवश्यक आहे.

पोस्ट ऑफिस अंतर्गत ही भरती ग्रुप सी डेप्युटेशन बेस वर केले जाणार आहे. त्यामुळे उमेदवारांना कोणत्याही लेखी परीक्षा किंवा मुलाखत द्यावी लागणार नाही. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला लेव्हल टू नुसार सुरुवातीला 19 हजार 900 रुपये मासिक वेतन दिले जाईल. सरकारी नोकरी असल्यामुळे उमेदवारांना विविध भत्ते आणि अन्य सुविधा देखील दिल्या जातील.

अर्ज कसा करावा? व शेवटची तारीख

उमेदवारांनी आपला अर्ज 8 फेब्रुवारी 2025 पूर्वी पाठवणे आवश्यक आहे. उमेदवारांनी आपला अर्ज सीनियर मॅनेजर, मेल मोटर सर्विस, नंबर ३७, ग्रुप्स रोड, 600006 या पत्त्यावर पोस्टाद्वारे पाठवणे आवश्यक आहे. Post Office Requirement

दरम्यान पोस्ट ऑफिस मध्ये नोकरी करू इच्छित असणाऱ्या उमेदवारांसाठी ही सुवर्णसंधी आहे. त्यामुळे पात्र असलेल्या उमेदवारांनी लवकरात लवकर आपला अर्ज वरील दिलेल्या पत्त्यावर पाठवावा. सर्व उमेदवारांनी आपला अर्ज करून या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी इंडियन पोस्ट ऑफिसच्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊन उर्वरित माहिती घेणे आवश्यक आहे.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन करा

Leave a Comment