PM Kisan Yojana: शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती बळकट करण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 2019 साली प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरू केले आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये आर्थिक मदत केली जाते. या योजनेअंतर्गत आतापर्यंत पात्र शेतकऱ्यांना 18 हप्ते मिळाले आहेत. त्यानंतर या योजनेचा 19 वा हप्ता केंद्र सरकारकडून फेब्रुवारी 2025 च्या अखेरीस पात्र लाभार्थ्यांना देण्यात येणार आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार आणि केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी दिलेल्या माहितीनुसार प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 19 व हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात महाडीबीटी द्वारे जमा केला जाणार आहे. येत्या 24 फेब्रुवारी रोजी कृषी कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी प्रधानमंत्री बिहारला जाणार आहे. त्यादिवशी प्रधानमंत्री शेतकऱ्यांच्या खात्यात 19 हप्त्याचे दोन हजार रुपये जमा करणार आहेत.
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी ई केवायसी प्रक्रिया करणे अनिवार्य आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 ऑक्टोबर 2024 रोजी प्रधानमंत्री किसान सन्मान योजना 18 वा हप्ता शेतकऱ्यांना दिला होता. यानंतर शेतकऱ्यांना 19 व्या हप्त्याची प्रतीक्षा लागली होती. पी एम किसान सन्मान निधी योजना ही एक केंद्रीय योजना आहे ज्याला भारत सरकारकडून शंभर टक्के निधी मिळतो. हा निधी थेट लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केला जातो. PM Kisan Yojana
पी एम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत दरवर्षी सहा हजार रुपयांचे तीन समान हपमध्ये दोन हजार रुपयाप्रमाण हप्ता वितरित केला जातो. पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये प्रत्येकी दोन हजार रुपये जमा केले जातात. या योजनेची शेतकऱ्यांनी ही केवायसी करणे महत्त्वाचे आहे. पी एम किसान योजनेचे फायदे अनेक बनावट नागरिक घेत आहेत त्यामुळे या लोकांना या योजनेतून बाद करण्यासाठी ही प्रक्रिया केली जाते. तसेच कोणत्याही मध्ये स्थानाच्या सहभागी शिवाय शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये डायरेक्ट महाडीबीटी द्वारे पैसे जमा केले जातात.
लाभार्थी शेतकरी इ केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी खालील तीन पर्यायांपैकी कोणत्याही एका पर्याय द्वारे करू शकतात. ओटीपी आधारित केवायसी, बायोमेट्रिक पद्धतीने ई केवायसी आणि स्टेट सर्विस सेंटर फेस-अथेंटीकेशन आधारित ई केवायसी पात्र लाभार्थ्यांनी आधार कार्ड नागरिकतत्त्वांचा पुरावा त्यांच्या मालकीची जमीन सिद्ध करणारी कागदपत्रे त्यांच्या बँक खात्याची माहिती आणि ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेसाठी नोंदणी करण्यासाठी पात्र शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री किसान पोर्टलला भेट द्यावी आणि ऑनलाईन नोंदणी करून घ्यावी. याशिवाय ते जवळच्या सीएसटी सेंटर मध्ये जाऊन किंवा तुमच्या राज्याच्या नोडल अधिकाऱ्यांशी संपर्क साधून नोंदणी करू शकता.