PM KISAN TRACTOR YOJANA 2024 | सरकारकडून शेतकऱ्यांना व नागरिकांना आर्थिक पाठबळ देण्यासाठी अनेक अशा योजना राबवल्या जातात. त्या योजना अंतर्गत शेतकऱ्यांना मोठ्या लाभ दिला जातो. परंतु याच भोळ्या भावड्या शेतकऱ्यांची या योजनेद्वारे फसवणूक केली जाते. सध्या अशाच काही बनावट योजनांची माहिती वायरल होत आहे. ती म्हणजे (PM KISAN TRACTOR YOJANA 2024) पंतप्रधान किसान ट्रॅक्टर योजना तरी योजना खरी का खोटी जाणून घेऊया सविस्तर माहिती.
सध्या डिजिटल जमाना आहे, आता सर्व शेतकरी वर्ग ऑनलाईन झालेला आहे. व त्याचाच फायदा म्हणून या शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणामध्ये फसवणूक केली जाते. इंटरनेटवर पी एम किसान ट्रॅक्टर योजनेची वेबसाईट आहे. यावर दावा केला जात आहे की, पंतप्रधान किसान ट्रॅक्टर योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना ट्रॅक्टर खरेदीसाठी सरकारकडून 50 टक्के सबसिडी दिली जाईल.
शेती हवामान आणि बाजार भाव विशेष बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा
पंतप्रधान किसान ट्रॅक्टर योजना ( Pradhan Mantri Kisan Tractor Scheme )
पंतप्रधान किसान ट्रॅक्टर योजना अंतर्गत केंद्र सरकार 50% अनुदान देण्यात येत असून, त्यामुळे शेतकऱ्यांना अर्ध्या किमतीत ट्रॅक्टर उपलब्ध होणार असल्याचे सांगितले जात आहे. वेबसाईटवर या संदर्भात माहिती उपलब्ध आहे. आज आम्ही तुम्हाला या व्हायरल योजनेबद्दल सविस्तर माहिती खरी का खोटी देणार आहोत.
ट्रॅक्टर खरेदीसाठी सरकारकडून 50 टक्के अनुदान?( 50 percent subsidy from Govt for purchase of tractors)
तुम्हाला सोशल मीडिया द्वारे किंवा इतर माध्यमातून. पी एम किसान ट्रॅक्टर योजनेअंतर्गत 50 टक्के सबसिडी दिली जाते. असल्याचे अनेक जण या योजनेसाठी अर्ज करण्याचा प्रयत्न करतात. परंतु ही माहिती जर तुम्हाला मिळाली असेल तर, तुम्ही या योजनेसाठी अर्ज करत असाल तर या बाबत सत्यता पडताळून घ्या.
हे पण वाचा: या तारखेला येणार पीएम किसन योजनेचा सोळावा हप्ता वाचा सविस्तर माहिती
अर्ध्या किमतीत नवीन ट्रॅक्टर खरेदी करायचा? सरकारची योजना काय? Want to buy a new tractor at half price? What is the government’s plan?
PIB फॅट मध्ये या योजनेबाबत धक्कादायक माहिती समोर आलेली आहे. पीआयबी फॅट नुसार पंतप्रधान किसान ट्रॅक्टर योजना ही सरकार योजना नाही. पीएम किसान ट्रॅक्टर योजना वेबसाईट इंटरनेटवर सध्या वायरल होत आहे. पण ही वेबसाईट आणि योजना सरकारकडून राबविण्यात येत नसल्याचा समोर आलेला आहे. पी एम किसान ट्रॅक्टर योजना एक बनवत योजना असून केंद्र सरकारकडून अशा प्रकारची कोणती योजना राबवण्यात येत नसल्याचे सांगितले गेले आहे. वेबसाईट आणि योजना बनावट आहे.
या योजनेसाठी अर्ज करू नका ( Do not apply for this scheme )
जर तुम्ही या योजनेसाठी अर्ज करत असाल तर सावधान! कारण ही योजना बनवत असल्याचे सिद्ध झालेला आहे. अनेक योजनेची मदत घेऊन अनेक फसवणूक करणारे पीएम किसांच्या नावाने अनेक वेबसाईट चालवत आहेत. तर अशा बानवट वेबसाईट पासून दूर राहा आणि बनावट जाहिराती पासून दूर राहा. पीएम किसान ट्रॅक्टर योजनेसाठी जारी केलेल्या बनावट वेबसाईटवर अर्ज करू नका. व कुठलेही चलन भरू नका.
बनावट योजने पासून सावधान !( Beware of fake schemes! )
तुम्हाला बनावट योजने पासून सावध राहण्याची गरज आहे सध्या इंटरनेटवर अनेक अशा जाहिराती व योजना योजना उपलब्ध आहेत आतापर्यंत अनेक बनावट योजनेच्या वेबसाईट बंदही करण्यात आलेला आहे पण तरीही सध्या अनेक वेबसाईट अस्तित्वात आहेत त्यामुळे जेव्हा तुम्ही कोणत्याही योजनेसाठी अर्ज करता तेव्हा तुम्हाला संबंधित विभागाकडून त्या योजनेचे संबंधित माहिती घेणे आवश्यक आहे बनावट योजने पासून सावध रहा.
मला ट्रॅक्टर घ्यायच आहे