Pm Kisan Scheme News : शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळावी म्हणून केंद्र सरकार नेहमीच शेतकऱ्यांसाठी विविध योजना देत आहे. सरकार या योजनेचे माध्यमातून शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्याचा प्रयत्न करीत आहे.
सरकारने देशातील शेतकऱ्यांना अनेक योजना सुरू केली आहे जसे की किसान फसल विमा योजना, पारंपरिक कृषी विकास योजना, किसान क्रेडिट कार्ड योजना, यातूनच एक असणारी योजना म्हणजे पी एम किसान सन्माननिधी योजना. या योजनेचा लाभ देशातील 8 करोड शेतकरी घेत आहेत.
शेती हवामान आणि बाजार भाव विशेष बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा
Pm Kisan Samman Nidhi Yojana या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वार्षिक 6 हजार रुपये रक्कम देत आहे. आतापर्यंत या योजनेचे 15 हप्ते शेतकऱ्यांना देण्यात आले आहे, व आता शेतकरी 16 हप्त्याची वाट बघत आहेत. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वार्षिक 3 हप्ते मध्ये 2 हजार रुपये प्रत्येकी हप्ता शेतकऱ्यांच्या बँक अकाउंट मध्ये जमा करीत आहे. आतापर्यंत केंद्र सरकार द्वारा 15 हप्त्याचे पैसे शेतकऱ्यांचे अकाउंट मध्ये जमा झाले आहेत. मागील पंधरावा हप्ता शेतकऱ्यांच्या अकाउंट मध्ये 15 नोव्हेंबर 2023 ला जमा करण्यात आला होता.
पी एम किसान योजनेचा कधी पडणार 16 हप्ता ,
आतापर्यंत कसलेही प्रकारची ऑफिशियल घोषणा केली नाही की, कधीपर्यंत पडणार शेतकऱ्यांचे अकाउंट मध्ये 16 हप्ता बाबत काही न्यूज च्या माध्यमातून असे समोर आले आहे, की फेब्रुवारी किंवा मार्चमध्ये केंद्र सरकार द्वारे 16 हप्ता शेतकऱ्यांच्या अकाउंट मध्ये जमा होणार आहे.
हे काम केले नाही तर पडणार नाही 16 हप्ता
आतापर्यंत ज्या शेतकऱ्यांनी केवायसी ( KYC ) केली नाही त्या शेतकऱ्यांना 16 हप्ता पडणार नाही. शेतकऱ्यांनी आतापर्यंत जमीन प्रमाणीकरण केली नाही अशा शेतकऱ्याला सुद्धा हप्ता पडणार नाही. जर तुम्हाला पीएम किसन योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही लवकर लवकर करून घे 2 कामे. तुम्ही केव्हाही करण्यासाठी तुमच्या जवळच्या सीएससी ( CSC )सेंटर मध्ये जाऊन केवायसी करून घेऊ शकता. ( Pm Kisan Samman Nidhi Yojana)