Onion Market in Maharashtra | नगर तालुका कृषी बाजार समितीमध्ये नेप्ती उपबाजार समितीमध्ये लाल कांद्याचे भाव तब्बल क्विंटल मागे 700 रुपयांनी घसरले आहेत, शेतकरी निराश झालेले दिसून येत आहेत.
कांद्याचे भाव क्विंटलमागे 700 रुपयांनी घसरले आहे. ज्या करणारे शेतकऱ्यांची चिंता वाढवली आहे. बाजार समितीमध्ये लिलावासाठी एकूण पावणे दोन लाख गोण्यांची आवक झाली होती. याच विक्रमी आवक झाल्यामुळे भावामध्ये मोठी घसरण दिसून आली आहे. नगर तालुका कृषी बाजार समितीच्या नेप्ती उप बाजार समितीमध्ये एक लाख 72 हजार 711 म्हणजेच 94 हजार क्विंटल इतकी विक्रमी कांद्याची आवक झाली आहे.
श्रीराममूर्ती प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यामुळे 22 जानेवारीला लिलाव बंद होता. व त्याआधी 20 जानेवारीला कांद्याची दोन लाख 44 हजार गोणीची आवक झाली आहे. 22 जानेवारी दिवशी एक नंबर कांद्यात ला 199 रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला होता.
गुरुवारी मात्र लिलावासाठी पावणेदोन लाख गोण्याची आवक झाली असून, निर्यात बंदीमुळे सध्या कांद्याचे भाव घसरलेले दिसून येत आहेत. व लाल कांदा लवकरच खराब होत असल्यामुळे व्यापाऱ्यांकडून लाल कांद्याची मागणी कमी झाली आहे. याच कारणामुळे कांद्याचे भाव घसरले आहे असे व्यापारीचे मत व्यक्त होत आहे.
यानंतर गुरुवारी एक नंबर कांद्याला 900 ते 1200रुपये इतका दर मिळाला आहे. त्याचबरोबर नंबर दोनच्या कांद्याला 500 ते 800 रुपये व नंबर तीन चे कांद्याला 250 ते 400 रुपये भाव मिळाला आहे. लहान कांद्याला मात्र शंभर ते दोनशे रुपये क्विंटल प्रमाणे विक्री झालेली आहे. अशा भावामुळे शेतकऱ्यांना मात्र उत्पन्नाचा खर्च खिशातून टाकण्याची वेळ आली आहे. अशा कांद्याचे भाव मुळे शेतकऱ्यांमध्ये संतप्त भावना निर्माण झाले आहे.
लाल कांद्याची मागणी झाली कमी
निर्यात बंदीमुळे सध्या कांद्याचे भाव घसरले असून, त्यामध्ये लाल कांदा लवकर खराब होतो या कारणाने व्यापाऱ्यांकडून लाल कांद्याची मागणी कमी झालेली दिसून आली आहे. या कारणाने लाल कांद्याचे भाव घसरलेले दिसत आहेत.