Thursday

20-03-2025 Vol 19

शेतकऱ्यांसाठी खुशखबर PM Kisan योजनेचे लाभार्थी यादी जाहीर; या स्टेप्स फॉलो करा आणि आपले नाव तपासा!

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

PM Kisan : पी एम किसान योजनेच्या लाभार्थी यादीत तुमचे नाव सहज तपासू शकतात. केंद्र सरकारने 2018 च्या अखेरीस पंतप्रधान किसान सन्माननीय योजना सुरू केली. या योजनेअंतर्गत दरवर्षी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात सहा हजार रुपये जमा केले जातात. ही रक्कम हप्त्यांमध्ये मिळते. यावर्षी जुलैमध्ये या योजनेचा 14 वा हप्ता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केला होता.

आता देशातील कोट्यावधी शेतकरी 15 वा हप्ता योजनेची वाट पाहत आहे. जर तुम्ही या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी नोंदणी केली असेल, तर आता तुम्ही पीएम किसान योजनेच्या लाभार्थी यादी तुमचे नाव सहज पाहु शकता.

सर्वात आधी तुम्हाला पीएम किसान सन्मान निधी (https://pm Kisan.gov.in/) च्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल. यानंतर तुम्हाला वेबसाईटवर दिसत असलेल्या know your status चा पर्याय निवडावा लागेल.

यानंतर तुम्हाला तुमचा नोंदणी क्रमांक (रजिस्ट्रेशन नंबर) टाकावा लागेल. जर तुमच्याकडे नोंदणी क्रमांक नसेल तर now your registration no या पर्यायावर क्लिक करा. यानंतर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर आणि कॅपचा टाकावा लागेल.

आता तुम्हाला एक ओटीपी मिळेल. ओटी टाकल्यानंतर तुम्हाला नोंदणी क्रमांक कळेल. नोंदणी क्रमांक टाकल्यानंतर तुम्हाला तुमचे स्टेटस कळेल.

तुम्हाला तुमच्यासोबत तुमच्या गावातील लोकांची नावे पाहायची असतील, तर तुम्हाला पीएम किसान वेबसाईटवर जाऊन beneficiary list चा पर्याय निवडावा लागेल.

यानंतर तुम्हाला तुमचे राज्य, जिल्हा, ब्लॉक आणि गावाचे नाव टाकावे लागेल. यानंतर, तुम्ही beneficiary list डाउनलोड करू शकता आणि तुमच्या नावासह गावातील आणखीन कोणाला या योजनेचा लाभ मिळत आहे ते पाहू शकतात.

हेल्पलाइन क्रमांक

पी एम किसान योजनेची संबंधित कोणत्याही समस्येसाठी, तुम्ही पीएफ किसन योजनेच्या एक हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधू शकता. याशिवाय, तुम्ही पीएम किसान योजनेचे स्टेटस चेक करण्यासाठी 15 52 61 वर कॉल करू शकता.

Rushikesh

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *