Namo Shetkari Yojana Installment: महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्यासाठी नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना सुरू केली आहे. या योजनेचे उद्दिष्ट राज्यातील लहान आणि गोरगरीब शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ देणे आहे. या योजनेद्वारे शेतकऱ्यांना त्यांच्या कृषी क्षेत्राला चालना देण्यासाठी त्यांचे उत्पन्न सुधारण्यासाठी आणि आर्थिक स्थिती प्रबळ बनवण्यासाठी शेतकऱ्यांना थेट आर्थिक मदत दिली जाते.
केंद्र सरकार अंतर्गत चालवल्या जाणाऱ्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेप्रमाणेच ही योजना देखील राज्यस्तरावर काम करते. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना प्रतिवर्षी सहा हजार रुपये आर्थिक मदत दिली जाते याचप्रमाणे नमो शेतकरी योजनेअंतर्गत देखील प्रतिवर्ष सहा हजार रुपये आर्थिक मदत दिली जाते. या दोन्ही योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना 12 हजार रुपये प्रति वर्ष दिले जातात. Namo Shetkari Yojana Installment
हे पण वाचा | शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या दिवशी जमा होणार 19 वा हप्ता; फक्त याच शेतकऱ्यांना मिळणार फायदा..
महाराष्ट्र सरकार शेतकऱ्यांना वर्षभरात तीन हप्त्यांमध्ये आर्थिक साह्य प्रदान करते. या योजनेअंतर्गत आतापर्यंत पाच हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये महाडीबीटी द्वारे जमा केले आहे. यानंतर शेतकऱ्यांना सहावा हप्ता कधी मिळणार असा प्रश्न पडला आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सहावा हप्ता फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्याची शक्यता आहे. मात्र याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी प्रसारमाध्यमांमध्ये पसरणाऱ्या फसव्या बातम्या पासून सावध राहावे. त्या अगोदर आपण या योजनेचे स्टेटस कसे तपासावे याबद्दल माहिती जाणून घेऊया.
हे पण वाचा | या लाडक्या बहिणींचे खटाखट पैसे येणे बंद होणार! लाडकी बहीण योजनेसाठी नवीन नियम लागू..
नमो शेतकरी योजनेचे बेनिफेसरी स्टेटस कसे तपासावे?
- नमो शेतकरी योजनेचे स्टेटस तपासण्यासाठी सर्वप्रथम अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
- त्यानंतर beneficiary status या पर्यायावर क्लिक करा.
- यानंतर टेटस तपासण्यासाठी मोबाईल नंबर किंवा रजिस्ट्रेशन नंबर यापैकी एक निवडा.
- त्यानंतर नंबर टाकून कॅप्चर कोड भरा आणि गेट मोबाईल ओटीपी या पर्यायावर क्लिक करा.
- आता तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबर वर एक ओटीपी प्राप्त होईल तो भरून सबमिट या बटणावर क्लिक करा.
- शेवटी तुमच्या समोर नमो शेतकरी योजनेचे सर्व इन्स्टॉलमेंट ची माहिती दिसेल.
- यामध्ये तुम्हाला समजेल की आतापर्यंत तुम्हाला या योजनेचे किती हप्ते मिळाले आहेत.