Ladki Bahin Yojana: महाराष्ट्र सरकारने राज्यातील गोरगरीब महिलांना आर्थिक दृष्ट्या प्रबळ बनवण्यासाठी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत महाराष्ट्र सरकार लाभार्थी महिलांना दरमहा 1500 रुपयाची आर्थिक मदत देते. मात्र मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून होणाऱ्या उधळपट्टीला लगाम घालवण्यासाठी सरकारने नवीन निर्णय घेतला आहे. सरकार योजनेसाठीच्या निकषाची कठोर पडताळणी करणार आहे. यामध्ये सध्या लाभ घेत असलेल्या अनेक महिला लाडकी बहीण योजनेसाठी अपात्र ठरणार आहेत.
अनेक अशा महिला आहेत ज्या वेगवेगळ्या सरकारी योजनेच्या माध्यमातून लाभ घेत आहेत आणि अनेक महिलांचे उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त आहे, अशा महिलांना लाडकी बहीण योजनेतून वगळण्याचा सरकारने निर्णय घेतला आहे. महिलांचे उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त आहे की नाही हे सरकार आयकर विभागाच्या मदतीने तपासणार आहे. त्यामुळे निकषाचे पालन न करणारे अनेक लाडक्या बहिणी या योजनेतून अपात्र ठरणार आहेत.
हे पण वाचा | लाडक्या बहिणीसाठी मोठी अपडेट! महिलांना दरवर्षी ई-केवायसी करावी लागणार, जाणून घ्या सविस्तर..
आता नवीन नियमानुसार लाभार्थी महिलांना बँक खात्यात दरवर्षी जून ते जुलै दरम्यान ई केवायसी करावी लागणार आहे. त्याचबरोबर लाभार्थी महिला हयात असल्याचा दाखला देखील महिलांना दरवर्षी द्यावे लागणार आहे. यानंतर लाडकी बहीण योजनेचे पैसे लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जमा केले जातील. ज्यामुळे या योजनेचा चुकीचा वापर केला जाणार नाही. या योजनेसाठी पात्र असलेल्या महिलांनाच या योजनेचा लाभ दिला जाणार आहे. Ladki Bahin Yojana
लाडकी बहीण योजनेसाठी सुरुवातीला तब्बल दोन कोटी 63 लाख लाडक्या बहिणींनी नोंदणी केली होती. मात्र त्यापैकी फक्त दोन कोटी 41 लाख महिलाच पात्र ठरल्या आहेत. यामधील अकरा लाख महिलांच्या आधार सोबत बँक खाते जोडलेले नाही. ज्या महिलांच्या आधार कार्ड बँक खात्याला लिंक नाही त्या महिलांना लडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही. राज्य सरकारने जानेवारी महिन्यात पाच लाख महिला लाडकी बहीण योजनेतून अपात्र ठरवल्या आहेत. यापैकी अनेक महिलांनी सरकारचे नियम कठोर झाल्यानंतर स्वतःहून आम्हाला या योजनेचा लाभ नको असा अर्ज केला आहे.
हे पण वाचा | फेब्रुवारी महिन्यात ‘या’ लाडक्या बहिणी होणार अपात्र; काय कारण? वाचा सविस्तर
त्यासोबतच संजय गांधी निराधार योजनेचा आणि मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा या दोन्ही योजनेचा लाभ घेत असलेल्या 2.30 लाख महिलांना या योजनेतून अपात्र ठरवण्यात आले आहे. याशिवाय सरकारच्या विविध योजनेमधून 1500 किंवा त्यापेक्षा अधिक आर्थिक रक्कम मिळवणाऱ्या महिलांना आता या योजनेतून वगळण्यात आले आहे. राज्यातील तब्बल साडेसहा लाख लाभार्थी महिला नमो शेतकरी आणि लाडके बहीण योजना या दोन्ही योजनेचा लाभ घेत आहेत. नमो शेतकरी योजनेअंतर्गत पात्र शेतकरी महिलांना देखील या योजनेचा लाभ दिला जाणार नाही. त्याचबरोबर लाडकी बहीण योजनेसाठी नव्याने पात्र झालेल्या लाभार्थ्यांना आधीच्या महिन्याचा लाभ दिला जाणार नाही त्यांना आता सुरू असलेल्या महिन्याचा लाभ दिला जाणार आहे.
2 thoughts on “या लाडक्या बहिणींचे खटाखट पैसे येणे बंद होणार! लाडकी बहीण योजनेसाठी नवीन नियम लागू..”