Namo Shetkari Maha Samman Nidhi Yojana : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. लवकर शेतकऱ्यांच्या अकाउंट मध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे. राज्य सरकार व केंद्र सरकार द्वारे शेतकऱ्यांना आता वर्षाकाठी बारा हजार रुपये मिळणार आहेत. तर राज्य सरकारच्या नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेचा पहिला आपला शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची दिवाळी गोड असणार आहे.
नमो शेतकरी सन्मान निधी योजना हि राज्य सरकारची योजना आहे या योजनेमुळे शेतकऱ्यांना मध्ये पुन्हा एकदा आनंदाची लाट पसरलेली दिसून येत आहे कारण त्यांना वर्षाला या योजनेअंतर्गत सहा हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाणार आहे हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात प्रत्येकी दोन हजार रुपयांच्या तीन हप्त्यांमध्ये वितरित करण्यात येणार आहे.
पी एम किसान योजना
शेतकरी मित्रांसाठी आनंदाची बाब म्हणजे? लवकर शेतकऱ्यांना केंद्र सरकार द्वारे सुरू असलेल्या पीएम किसान योजनेचा हप्ता वितरित करण्यात येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिवाळी बोनस मिळणार आहे मिळणार आहे. राज्य सरकारच्या नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेचा हप्ता जमा होणार. तसेच पी एम किसान योजनेचा 15 वा हप्ता सुधा जमा होणार आहे. त्यामूळे शेतकऱ्याना दिवाळी साठी शासनाकडून 4000 हजार रुपयांचे बोनस मिळणार आहे.
कसे मिळतील 12 हजार रुपये
तर मित्रांनो तुम्हाला जर योजनेचे बारा हजार रुपये मिळवायचे असतील तर त्यासाठी तुम्हाला पीएम किसन योजनेचे रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे. केंद्र सरकार द्वारे सुरू असलेल्या पीएम किसान योजनेअंतर्गत येणाऱ्या पात्र शेतकऱ्यांना नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचे पैसे मिळणार आहेत. तर केंद्र सरकारचे सहा हजार रुपये आणि राज्य सरकारचे सहा हजार रुपये असे दोन्ही मिळून शेतकऱ्यांना वर्षाला 12000 रुपयांची आर्थिक मदत मिळणार आहे.