Majhi Ladki Bahin Yojana: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत जानेवारी महिन्यांचा हप्ता महिलांच्या खात्यात जमा झालेला आहे. जानेवारी महिन्यात मिळालेल्या आकडेवारीनुसार लाडक्या बहिणींची संख्या 2 कोटी 41 लाख इतकी होती. म्हणजेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या घटली आहे. कारण डिसेंबर महिन्यात लाडक्या बहिणींची संख्या दोन कोटी 46 लाख इतकी होती. जानेवारी महिन्यात त्यात घट होऊन लाभार्थ्यांची संख्या दोन कोटी एकेचाळीस लाख इतकी झाली आहे. म्हणजे या योजनेअंतर्गत पात्र असलेल्या पाच टक्के महिला अपात्र ठरवण्यात आल्या आहेत.
गेल्या वर्षी राज्य सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1500 रुपयाची आर्थिक मदत दिली जाते. आतापर्यंत या योजनेअंतर्गत सात महिन्याचे एकूण दहा हजार पाचशे रुपये पात्र महिलांच्या खात्यात जमा केले आहेत. यानंतर लाडक्या बहिणींना आठव्या हप्त्याचे म्हणजे फेब्रुवारी महिन्याचे पैसे कधी मिळतील याची प्रतीक्षा लागली आहे. सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार फेब्रुवारी महिन्याचा हप्ता फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात महिलांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे.
दरम्यान लाडकी बहिणी योजनेच्या लाभार्थ्यांची छाननी सुरू आहे. छाननी दरम्यान लाडकी बहीण योजनेच्या निकषात न बसणाऱ्या महिलांना या योजनेतून अपात्र ठरवले जात आहे. जानेवारी महिन्यात पाच टक्के महिला अपात्र ठरविण्यात आल्या आहेत. यानंतर फेब्रुवारी महिन्याच्या वितरणादरम्यान आणखीन लाभार्थ्यांची संख्या कमी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कारण अनेक ठिकाणी अर्जाची छाननी सुरू आहे दरम्यान अनेक महिला या योजनेतून अपात्र असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे या महिन्यात किती महिला पत्र होतील हे पाहण्यासारखे आहे.
लाभार्थ्यांची संख्या कशामुळे कमी झाली?
लाडकी बहीण योजनेतून कमी झालेल्या पाच लाख लाभार्थ्यांपैकी जवळपास दीड लाख लाभार्थ्यांचे वय 65 वर्ष पेक्षा जास्त आहे. त्यामुळे या महिलांना अपात्र ठरवण्यात आले आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील नियमानुसार या योजनेचा लाभ 21 ते 65 वयोगटातील महिलांनाच दिला जातो. राज्य सरकारने महिलांच्या आर्थिक विकासासाठी या योजनेची सुरुवात केली आहे. या योजनेचा विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीच्या सरकारला मोठा फायदा झाला आहे. Majhi Ladki Bahin Yojana
महिला व बालविकास विभागाच्या नियमानुसार ज्या महिलांच्या नावावर किंवा कुटुंबात कोणाकडेही चार चाकी वाहन असेल तर त्या महिला या योजनेसाठी अपात्र आहेत. ज्या महिलांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त आहे त्या महिला देखील या योजनेसाठी अपात्र आहेत. याशिवाय ज्या महिलांना नोकरी आहे किंवा त्या महिला इतर सरकारी योजनेअंतर्गत आर्थिक लाभ घेत आहेत त्या महिला देखील या योजनेतून अपात्र होत आहेत. त्याचबरोबर ज्या महिलांच्या कुटुंबातील एखाद्या व्यक्ती आयकर भरत असेल तर त्या महिला देखील या योजनेतून अपात्र होत आहेत.
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार?
दरम्यान विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान पात्र महिलांना 1500 रुपये ऐवजी 2100 रुपये देऊ असे आश्वासन महायुती सरकारच्या नेत्यांनी दिले होते. मात्र अजून लाडक्या बहिणींना 2100 रुपये मिळाले नाहीत. राज्यातील लाडक्या बहिणी 2100 रुपयाच्या अंमलबजावणीची प्रतीक्षा करत आहेत. महायुतीने दिलेले आश्वासन अर्थसंकल्पानंतर पूर्ण होईल अशी अपेक्षा वर्तवली जात आहे. मार्च महिन्यातील अर्थसंकल्पानंतर लाडक्या बहिणींना 2100 रुपये मिळतील अशी आशा राज्यातील महिलांना आहे.